एसटीचा कायापालट: २०३५ पर्यंत सर्व बसेस होणार ‘इलेक्ट्रिक’; राज्यात २०० चार्जिंग स्टेशन्स उभारणार

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्गपरिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यातील सर्व बसेस येत्या २०३५ पर्यंत ई-बसेसमध्ये रूपांतरित करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या ध्येयपूर्तीसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांचा भाग म्हणून राज्यभरात किमान २०० चार्जिंग स्टेशन्स उभारली जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या विशेष बैठकीत एसटी महामंडळाच्या भविष्यातील नियोजनाचा आढावा घेण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, पर्यावरणाचे रक्षण आणि इंधन खर्चात बचत करण्यासाठी एसटीचे पूर्णतः विद्युतीकरण करण्यावर भर दिला जात आहे. या चार्जिंग स्टेशन्सची उभारणी सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर केली जाणार असून, यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

राज्यातील प्रमुख बस स्थानके आणि आगारांमध्ये ही चार्जिंग स्टेशन्स उभारली जातील, जेणेकरून ई-बसेसच्या संचालनात कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही. २०३५ पर्यंत लालपरीचे स्वरूप पूर्णपणे बदलून ती प्रदूषणमुक्त आणि अत्याधुनिक करण्याचा महामंडळाचा मानस आहे. या बैठकीस एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, वित्तीय सल्लागार गिरीश देशमुख आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या निर्णयामुळे प्रवाशांना आधुनिक सेवा मिळण्यासोबतच एसटीच्या उत्पन्नातही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Posts

शिवाजी पार्कमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! सीजेपीच्या आंदोलनात ‘जय श्री राम’च्या घोषणा; पोलिसांच्या तत्परतेमुळे टळला अनर्थ

मुंबई: दादरच्या ऐतिहासिक शिवाजी पार्क परिसरात कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) आंदोलन सुरू असतानाच अचानक भगवे मफलर घातलेले काही कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ‘जय श्री राम’च्या जोरदार घोषणा द्यायला सुरुवात…

Read more

पॅनकार्ड क्लब घोटाळ्यात ईडीची मोठी कारवाई: ६४६.५८ कोटी रुपयांच्या २११ मालमत्ता जप्त

मुंबई: सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बहुचर्चित पॅनकार्ड क्लब घोटाळ्यात एक मोठी आणि कठोर कारवाई करत ६४६.५८ कोटी रुपयांच्या तब्बल २११ मालमत्ता जप्त केल्या आहेत. या कारवाईअंतर्गत ईडीने महाराष्ट्रासह देशातील नऊ राज्ये…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

Mr Jones online casino – what to know

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

Mr Jones Casino payment methods – instant UK deposits & fast withdrawals

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

QBet login guide for UK players – registration steps, security & mobile access

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

QBet Casino guide: UK players’ full overview of bonuses, payments and mobile app

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

QBet online casino – what UK players need to know

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

كيفية التحقق من حسابك في 1xbet بعد تحميل 1xbet 2025 APK في الإمارات

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views
error: Content is protected !!