महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर वादाच्या भोवऱ्यात! बलात्काराचा आरोप असलेल्या ‘भोंदू’ अशोक खरातची पाद्यपूजा आणि छत्री धरल्याचे फोटो व्हायरल

मुंबई : प्रतिनिधी 

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर सध्या एका मोठ्या राजकीय आणि सामाजिक वादाच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी आणि ‘कॅप्टन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात याला एका ३५ वर्षीय महिलेवर वारंवार बलात्कार आणि फसवणूक केल्याच्या आरोपाखाली नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेनंतर रूपाली चाकणकर यांचे खरातसोबतचे काही धक्कादायक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

पाद्यपूजा आणि छत्री धरल्याचा व्हिडिओ व्हायरल सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये रूपाली चाकणकर या अशोक खरातची ‘पाद्यपूजा’ (पाय धुताना) करताना दिसत आहेत. तसेच, अन्य एका फोटोमध्ये त्या भर पावसात खरातच्या डोक्यावर स्वतः छत्री धरून उभ्या असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, ज्या ‘श्री शिवनिका संस्थान’ ट्रस्टचा खरात अध्यक्ष आहे, त्याच ट्रस्टवर चाकणकर या संचालक म्हणून कार्यरत आहेत. या फोटोंमुळे “महिलांना न्याय देणाऱ्या पदावर बसलेली व्यक्ती एका लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या व्यक्तीसमोर नतमस्तक कशी होऊ शकते?” असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे.

‘महाराष्ट्राची एपस्टीन फाईल’ – सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल शिवसेना (ठाकरे गट) नेत्री सुषमा अंधारे यांनी या प्रकरणाला ‘महाराष्ट्राची एपस्टीन फाईल’ असे संबोधत चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. खरात याच्याकडे पोलिसांना ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ असलेला पेनड्राईव्ह सापडला असून, यामध्ये अनेक बड्या हस्तींचे चेहरे असू शकतात अशी भीती व्यक्त होत आहे. अंधारे यांनी असाही आरोप केला आहे की, यापूर्वी जेव्हा खरातवर लैंगिक शोषणाचे आरोप झाले होते, तेव्हा चाकणकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून तक्रारदारांवर दबाव आणला होता. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादी (अजित पवार) गटाच्याच नेत्या रूपाली ठोंबरे-पाटील यांनीही चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

रूपाली चाकणकर यांचे स्पष्टीकरण या वाढत्या वादानंतर रूपाली चाकणकर यांनी सोशल मीडियाद्वारे आपले स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “शिवनिका संस्थान हे एक महादेव देवस्थानचे ट्रस्ट असून सामाजिक कामाच्या निमित्ताने आम्ही अनेक प्रतिष्ठित व्यक्ती या ट्रस्टशी जोडले गेलो होतो. कॅप्टन खरात यांचे वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला कोणतीही कल्पना नाही. पोलीस या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करतील आणि माझा तपासावर पूर्ण विश्वास आहे.”

अशोक खरातवर गंभीर कलमान्वये गुन्हा अशोक खरात याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४ (बलात्कार), ६९ (फसवणूक करून लैंगिक संबंध) आणि जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाला असून स्वतःला ‘कॉस्मोलॉजी एक्स्पर्ट’ म्हणवून घेत राजकीय नेत्यांना भविष्य सांगत असे. त्याच्या फार्म हाऊसवर पोलिसांनी छापा टाकला असून तपासाची व्याप्ती मोठी असल्याचे सांगितले जात आहे.

Related Posts

कोल्हापूरमध्ये सावकारीचा जाच: ६ लाखांच्या कर्जापोटी उकळले अडीच कोटी, २ वर्षांच्या चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न

कोल्हापूर: महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये खाजगी सावकारांची मुजोरी आणि अत्याचाराचे एक अत्यंत धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका महिला अभियंत्याने (इंजिनिअर) ६ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते, ज्याच्या बदल्यात तिने सावकाराला तब्बल…

Read more

‘नशामुक्त नवी मुंबई’ मोहीम : ७२६ किलो अंमली पदार्थ केले नष्ट

नवी मुंबई : ‘नशामुक्त नवी मुंबई’ मोहिमेअंतर्गत पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेले सुमारे २६ कोटी ३० लाख रुपये किमतीचे ७२६ किलोग्रॅम अंमली पदार्थ नष्ट केले. ही कारवाई बुधवारी दुपारी तळोजा…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

Mr Jones online casino – what to know

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

Mr Jones Casino payment methods – instant UK deposits & fast withdrawals

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

QBet login guide for UK players – registration steps, security & mobile access

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

QBet Casino guide: UK players’ full overview of bonuses, payments and mobile app

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

QBet online casino – what UK players need to know

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

كيفية التحقق من حسابك في 1xbet بعد تحميل 1xbet 2025 APK في الإمارات

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views
error: Content is protected !!