नीलम गोरेंच्या नावात ‘नी’ ऐवजी ‘ची’ असायला हवे; सुषमा अंधारेंचा सडेतोड पलटवार

शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या सुनावणीवरून राजकीय वर्तुळात शाब्दिक चकमक उडाली आहे. ‘उबाठा’मधील ‘ठ’चा ‘ढ’ करा, या नीलम गोरेंच्या खोचक टीकेला प्रत्युत्तर देताना सुषमा अंधारे यांनी गोरेंच्या नावात ‘नी’ ऐवजी ‘ची’ असायला हवे, असा सडेतोड टोला लगावला आहे.

Read more

टीईटी घोटाळा फडणवीसांच्याच काळात; ठाकरे सरकारने तो उघडकीस आणला – सुषमा अंधारे

टीईटी घोटाळा ठाकरे सरकारच्या काळातला नसून तो उघडकीस आणून गुन्हेगारांना तुरुंगात टाकले होते, असे स्पष्ट करत शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.

Read more

सुषमा अंधारेंनी फडणवीसांना महिला मुख्यमंत्र्यांची यादीच वाचून दाखवली; ‘त्या’ विधानावरून घेतला समाचार

भाजपने आजवर किती महिला मुख्यमंत्री दिल्या? असा थेट सवाल करत शिवसेना (UBT) नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली आहे. अंधारे यांनी पत्रकार परिषदेत चक्क महिला मुख्यमंत्र्यांची यादीच वाचून दाखवत फडणवीसांच्या ‘स्तरा’वरून त्यांचा खरपूस समाचार घेतला.

Read more

अशोक खरात CDR प्रकरण: अंजली दमानिया आणि सुषमा अंधारे यांच्यात ‘एक्स-वॉर’; आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं

अशोक खरात यांच्या कथित सीडीआर (CDR) प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि सुषमा अंधारे यांच्यात शाब्दिक युद्ध पेटले आहे. गोपनीय माहितीच्या स्रोतावरून दोन्ही नेत्यांनी एकमेकींवर गंभीर आरोप केल्याने हे प्रकरण आता अधिकच चिघळले असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Read more

महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर वादाच्या भोवऱ्यात! बलात्काराचा आरोप असलेल्या ‘भोंदू’ अशोक खरातची पाद्यपूजा आणि छत्री धरल्याचे फोटो व्हायरल

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे पाद्यपूजेचे व्हिडिओ आणि छत्री धरल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. यावरून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत ‘महाराष्ट्राची एपस्टीन फाईल’ उघडल्याचा दावा केला आहे.

Read more

error: Content is protected !!