प्रशासनाच्या उदासीनतेमुळे गोळप-मानेवाडीतील दरडग्रस्त ५ वर्षांनंतरही मदतीविना; शिवसेना (UBT) युवासेना आक्रमक

रत्नागिरी : प्रतिनिधी

रत्नागिरी तालुक्यातील गोळप-मानेवाडी येथे २०२१ मध्ये झालेल्या भीषण भूस्खलन घटनेला पाच वर्षे उलटूनही येथील आपत्तीग्रस्तांना अद्याप कोणतीही ठोस शासकीय मदत किंवा कायमस्वरूपी पुनर्वसन मिळालेले नाही. प्रशासनाच्या या वेळकाढू धोरणाविरोधात आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवासेनेने आक्रमक पवित्रा घेतला असून जिल्हाधिकाऱ्यांना तातडीच्या उपाययोजनांसाठी निवेदन सादर केले आहे.

युवासेना जिल्हा युवाधिकारी प्रसाद सावंत यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी नुकताच या परिसराचा प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. या दौऱ्यात पाच वर्षांनंतरही येथील नागरिकांची परिस्थिती भीषण असल्याचे समोर आले असून ग्रामस्थ आजही दरवर्षी पावसाळ्यात जिवाच्या भीतीने आणि आर्थिक विवंचनेत जगत आहेत. तांत्रिक कारणांमुळे बाधितांची हक्काची मदत सरकारी दरबारी अडकून पडली असून ती तात्काळ त्यांच्या बँक खात्यावर जमा करावी, अशी मागणी युवासेनेने केली आहे.

यासोबतच भूस्खलन प्रवण क्षेत्रात राहणाऱ्या कुटुंबांचे सुरक्षित ठिकाणी तातडीने पुनर्वसन करावे आणि भविष्यातील धोका टाळण्यासाठी डोंगराच्या पायथ्याशी भक्कम संरक्षण भिंत उभारावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. २०२१ ची घटना अत्यंत गंभीर असतानाही प्रशासनाने दाखवलेली उदासीनता ही दुर्दैवी असून, या संवेदनशील विषयावर तात्काळ कार्यवाही न झाल्यास अधिक तीव्र पावले उचलली जातील, असा इशारा प्रसाद सावंत यांनी दिला. या प्रसंगी उपतालुका युवाधिकारी रितेश लोखंडे यांच्यासह युवासेनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Posts

रत्नागिरीत जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेचा थरार; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी : प्रतिनिधी रत्नागिरीत आज पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेला विद्यार्थ्यांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कसोप ते कोळंबे फाटा या मार्गावर ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. जिल्हा क्रीडा…

Read more

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सुवर्णझेप: ६००० कोटींच्या एकत्रित व्यवसायाचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण

रत्नागिरी : प्रतिनिधी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपल्या यशाची घोडदौड कायम राखत ३० सप्टेंबर २०२६ अखेर तब्बल ६००० कोटी रुपयांच्या एकत्रित व्यवसायाचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. ग्राहकांचा दृढ…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

Laadukas_atefia_ratkaisu_tarjoaa_kattavat_työkalut_ja_luotettavan_suojan_digita

  • By admin
  • October 4, 2026
  • 1 views

Conceptualización_avanzada_sobre_el_legado_crusado_y_su_influencia_perdurable

  • By admin
  • October 4, 2026
  • 1 views

रत्नागिरीत जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेचा थरार; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

  • By admin
  • October 3, 2026
  • 3 views
रत्नागिरीत जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेचा थरार; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सुवर्णझेप: ६००० कोटींच्या एकत्रित व्यवसायाचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण

  • By admin
  • October 3, 2026
  • 2 views
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सुवर्णझेप: ६००० कोटींच्या एकत्रित व्यवसायाचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी रत्नागिरीत ५ ऑक्टोबरला काँग्रेसचा मूक मोर्चा

  • By admin
  • October 3, 2026
  • 3 views
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी रत्नागिरीत ५ ऑक्टोबरला काँग्रेसचा मूक मोर्चा

चिपळूण: दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या मागणीसाठी ७ ऑक्टोबरला ‘इंडिया आघाडी’चा विराट मोर्चा

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views
चिपळूण: दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या मागणीसाठी ७ ऑक्टोबरला ‘इंडिया आघाडी’चा विराट मोर्चा
error: Content is protected !!