देशसेवेनंतर समाजसेवेचा वसा: माजी सैनिक अनंत गोखले यांचे रत्नागिरीत मरणोत्तर देहदान

रत्नागिरी:
भारतीय संरक्षण दलात कर्तव्य बजावून देशसेवा करणाऱ्या एका माजी सैनिकाने निधनानंतरही समाजसेवेची प्रेरणादायी परंपरा जपली आहे. मूळचे लिमयेवाडी (कर्ला, रत्नागिरी) येथील रहिवासी असलेले माजी सैनिक अनंत नरहर गोखले (वय ७८) यांचे गुरुवारी (२० ऑगस्ट) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या अंतिम इच्छेचा मान राखत आणि कुटुंबीयांच्या संमतीने त्यांच्या पार्थिवाचे रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मरणोत्तर देहदान करण्यात आले. विशेष म्हणजे, रत्नागिरीच्या शासकीय महाविद्यालयातील हे २२ वे देहदान ठरले आहे.
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या भावी डॉक्टरांना शरीररचनाशास्त्राचा प्रत्यक्ष आणि सखोल अभ्यास करता यावा, तसेच भविष्यातील वैद्यकीय संशोधनाला हातभार लागावा, या उदात्त हेतूने गोखले कुटुंबीयांनी हा निर्णय घेतला. हयातभर देशसेवेसाठी आयुष्य वेचणाऱ्या कै. गोखले यांनी निधनानंतरही समाजासमोर एक अत्यंत प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
कै. गोखले यांचे पार्थिव वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द करताना त्यांची कन्या रूपाली लिमये, जावई मंदार लिमये, राजीव लिमये, मिताली भिडे, दिनेश आगाशे, शिरीष सोहोनी यांच्यासह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. या प्रक्रियेत समीर करमरकर यांचे कुटुंबीयांना विशेष सहकार्य लाभले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिष्ठाता डॉ. रामा भोसले, शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ. योगिता कांबळे, समाजसेवा अधीक्षक रेशम जाधव आणि महाविद्यालयाच्या इतर कर्मचाऱ्यांनी ही देहदानाची प्रक्रिया अत्यंत सन्मानपूर्वक आणि यशस्वीरीत्या पूर्ण केली. गोखले कुटुंबीयांनी दुःखाच्या प्रसंगी घेतलेल्या या समाजोपयोगी निर्णयाबद्दल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने कृतज्ञता व्यक्त केली असून, समाजात देहदानासारख्या श्रेष्ठ दानाबाबत अधिक जनजागृती होण्याची गरजही प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

Related Posts

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे ८ ऑक्टोबरला रत्नागिरी दौऱ्यावर

रत्नागिरी : प्रतिनिधी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे गुरुवार, दि. ८ ऑक्टोबर २०२६ रोजी रत्नागिरी जिल्ह्याच्या अधिकृत दौऱ्यावर येत आहेत. या एकदिवसीय दौऱ्यानिमित्त ते जिल्ह्यातील विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी…

Read more

अलोरे येथे राष्ट्रीय पोषण माह व सेवा संकल्प अभियान उत्साहात; शासकीय योजनांचे महिला व पालकांना प्रबोधन

चिपळूण : प्रतिनिधी एकात्मिक बालविकास सेवा योजना चिपळूण-१ (दादर-२ बीट) अंतर्गत अलोरे येथे ९ वा राष्ट्रीय पोषण माह आणि ‘सेवा संकल्प अभियान’ विविध उपक्रमांनी अत्यंत उत्साहात संपन्न झाले. राष्ट्रपिता महात्मा…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

Sportunas laukuma svinības loču dambis

  • By admin
  • October 6, 2026
  • 0 views

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे ८ ऑक्टोबरला रत्नागिरी दौऱ्यावर

  • By admin
  • October 6, 2026
  • 0 views
शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे ८ ऑक्टोबरला रत्नागिरी दौऱ्यावर

अलोरे येथे राष्ट्रीय पोषण माह व सेवा संकल्प अभियान उत्साहात; शासकीय योजनांचे महिला व पालकांना प्रबोधन

  • By admin
  • October 6, 2026
  • 0 views
अलोरे येथे राष्ट्रीय पोषण माह व सेवा संकल्प अभियान उत्साहात; शासकीय योजनांचे महिला व पालकांना प्रबोधन

शिक्षक ई-केवायसीत राजापूर तालुक्याची शून्य कामगिरी, मंडणगड अव्वल

  • By admin
  • October 6, 2026
  • 1 views
शिक्षक ई-केवायसीत राजापूर तालुक्याची शून्य कामगिरी, मंडणगड अव्वल

ठाणे महापालिकेत टेंडरवरून वाद पेटला; अभियंत्याचा अपमान केल्याने कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

  • By admin
  • October 6, 2026
  • 1 views
ठाणे महापालिकेत टेंडरवरून वाद पेटला; अभियंत्याचा अपमान केल्याने कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

Tipps vor dem Spielen um echtes Geld

  • By admin
  • October 6, 2026
  • 2 views
error: Content is protected !!