दक्षिण रत्नागिरीत कमळ कोमेजतय?

दक्षिण रत्नागिरीत कमळ कोमेजतय?

​रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकीय पटलावर भारतीय जनता पक्षाने गेल्या काही वर्षांत अत्यंत कष्टाने आपली जागा निर्माण केली होती. कार्यकर्त्यांच्या रक्ताचे पाणी आणि सक्षम नेतृत्वाच्या धडाडीमुळे कोकणात कमळ फुलायला सुरुवात झाली होती. मात्र, आज रत्नागिरी दक्षिण विभागातील भाजपची अवस्था पाहता, ‘हे कमळ नेमके कोणामुळे कोमजतंय?’ असा टोकदार प्रश्न आता कार्यकर्त्यांच्या गोटातून विचारला जात आहे.

राजेश सावंत जिल्हाध्यक्ष असताना ज्या वेगाने पक्षाची बांधणी झाली आणि संघटनात्मक मजबुती आली, तोच पक्ष आज अचानक स्तब्ध का झाला? हा प्रश्न आज प्रत्येक निष्ठावान कार्यकर्त्याला सतावत आहे.
​राजकारणात ‘नेत्याचा वावर’ हा कार्यकर्त्यांसाठी टॉनिक असतो. नगरपरिषद निवडणुकीच्या काळात जे नाट्य घडले आणि त्यानंतर राजेश सावंत यांनी भाजपला रामराम ठोकला, तिथूनच रत्नागिरी दक्षिण भाजपच्या उतरतीला सुरुवात झाल्याचे दिसून येते. सावंत यांच्या काळात पक्ष केवळ कागदावर किंवा सोशल मीडियावर नव्हता, तर तो प्रत्यक्ष मैदानात होता. कार्यकर्त्यांना आपला जिल्हाध्यक्ष आपल्या हाकेला धावून येईल, याची खात्री होती. मात्र, सध्याची स्थिती अत्यंत निराशाजनक आहे. विद्यमान जिल्हा नेतृत्वाची कार्यपद्धती पाहता, पक्षाला बळकटी येण्याऐवजी दिवसेंदिवस मरगळ येऊ लागली आहे.

​या मरगळीचे मुख्य कारण म्हणजे जिल्हा नेतृत्वाची ‘भौगोलिक मर्यादा’. जिल्हाध्यक्ष हा संपूर्ण जिल्ह्याचा प्रतिनिधी असतो, परंतु सध्याचे नेतृत्व केवळ चिपळूण आणि संगमेश्वर मतदारसंघापुरतेच मर्यादित राहिल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. त्यांची गाडी या मतदारसंघांच्या पलीकडे जाताना दिसत नाही. गेलीच तर तीही क्वचितच. फक्त कार्यक्रमांना हजेरी लावण्यासाठी. परवा तर पक्ष्याच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमाला ‘या’ नेतृत्वाला उपस्थित राहण्यासाठी वेळही काढता आलेला नाही. रत्नागिरी हे जिल्ह्याचे मुख्य केंद्र असूनही, जिल्हाध्यक्षांचा या ठिकाणी असणारा वावर नगण्य आहे. जेव्हा जिल्ह्याचा मुख्य नेताच जिल्ह्याच्या केंद्रस्थानी फिरकत नाही, तेव्हा तिथल्या कार्यकर्त्यांनी कोणाच्या आधारावर पक्षाचे काम करायचे? हा प्रश्न अनुत्तरित आहे.

​जिल्हा नेतृत्वाने केवळ स्वतःच्या सोयीच्या मतदारसंघांमध्ये अडकून पडणे, हे पक्षाच्या वाढीसाठी अत्यंत घातक ठरत आहे. चिपळूण-संगमेश्वरच्या पुढे पक्ष नाही का? असा सवाल आता रत्नागिरी दक्षिणमधील इतर तालुक्यांतील कार्यकर्ते विचारू लागले आहेत. पक्षाचा सध्याचा देशभरातील आलेख पाहिला तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या झंझावातात सर्वत्र भाजप वाढत आहे. अगदी शेजारच्या जिल्ह्यांमध्येही पक्षाने मुसंडी मारली आहे. असे असताना केवळ रत्नागिरी दक्षिण विभागातच पक्ष का आक्रसत चालला आहे? याचे उत्तर स्थानिक नेतृत्वाच्या कार्यपद्धतीत दडलेले आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

​राजेश सावंत यांनी पक्ष सोडल्यानंतर जी पोकळी निर्माण झाली, ती भरून काढण्यात विद्यमान नेतृत्व सपशेल अपयशी ठरले आहे. कार्यकर्त्यांमध्ये आज प्रचंड अस्वस्थता आहे. जो कार्यकर्ता पूर्वी अभिमानाने पक्षाचा झेंडा घेऊन फिरायचा, तो आज नेतृत्वाच्या उदासीनतेमुळे घराबाहेर पडायला तयार नाही. जिल्हाध्यक्षांनी केवळ आपल्या बालेकिल्ल्यात बसून राहण्यापेक्षा, रत्नागिरी शहरासह दक्षिण विभागातील प्रत्येक तालुक्यात सक्रिय होणे गरजेचे होते. मात्र, प्रत्यक्षात तसे घडताना दिसत नाही. नेतृत्वाच्या या ‘निवडक’ भूमिकेमुळे सामान्य कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढू लागली आहे.

​वरिष्ठांनी आता या परिस्थितीचा गांभीर्याने आढावा घेण्याची वेळ आली आहे. जर जिल्हा नेतृत्व केवळ ठराविक मतदारसंघाच्या सीमेतच अडकून पडणार असेल, तर संपूर्ण दक्षिण रत्नागिरीत पक्ष कसा वाढणार? रत्नागिरी जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या ठिकाणी पक्षाची संघटनात्मक बांधणी खिळखिळी झाली आहे. ही मरगळ झटकण्यासाठी केवळ सूचना देऊन चालणार नाही, तर जमिनीवर उतरून काम करणाऱ्या नेतृत्वाची आवश्यकता आहे.

​रत्नागिरी दक्षिण भाजपला पुन्हा उभारी द्यायची असेल, तर जिल्हाध्यक्षांना चिपळूण-संगमेश्वरच्या बाहेर पडावेच लागेल. प्रत्येक मतदारसंघाला आणि तिथल्या कार्यकर्त्याला समान न्याय मिळाला, तरच कार्यकर्त्यांमधील आत्मविश्वास पुन्हा जागृत होईल. अन्यथा, नेतृत्वाच्या या संथ आणि मर्यादित गतीमुळे रत्नागिरीतील भाजपचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. वरिष्ठ नेत्यांनी आताच हस्तक्षेप करून या मरगळीमागच्या कारणांचा शोध घ्यायला हवा, तरच आगामी काळात येथे पुन्हा कमळ आत्मविश्वासाने डोलताना दिसेल. सडेतोड सांगायचे तर, नेतृत्वाने आपली ‘कक्षा’ रुंदावली नाही, तर पक्षाचे नुकसान अटळ आहे.

– दिपक भागवत, कार्यकारी सांपादक.

Related Posts

संपादकीय: ‘जेन झी’चा विजय, लोकशाही पर्वाची नांदी?

दिल्लीतील जंतरमंतरवरील ऐतिहासिक ‘जेन झी’ आंदोलनासमोर झुकत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना दिलेला राजीनामा हा गेल्या तेरा वर्षांच्या दडपशाहीच्या राजकारणाचा पराभव आहे. विद्यार्थ्यांच्या अभूतपूर्व संयम आणि निर्भयतेमुळे सत्तेच्या मग्रुरीला चपराक बसली असून, हा विजय भारतीय लोकशाहीतील एका नव्या पर्वाची नांदी ठरणार आहे.

Read more

अग्रलेख : शिक्षणाचा ‘इव्हेंट’ आणि वास्तवाचा विसर!

पहिलीची पावले उत्साहाने शाळेकडे वळली खरी, पण नेत्यांच्या ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ने या निरागस आनंदावर प्रसिद्धीची धूळ उडवली. गळके छत, अपुरे शिक्षक आणि पायाभूत सुविधांचा अभाव असलेल्या ग्रामीण शाळांचे विदारक वास्तव मांडणारा आणि शिक्षण व्यवस्थेच्या ‘खेळखंडोबा’वर बोट ठेवणारा एक परखड अग्रलेख.

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

Mr Jones online casino – what to know

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

Mr Jones Casino payment methods – instant UK deposits & fast withdrawals

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

QBet login guide for UK players – registration steps, security & mobile access

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

QBet Casino guide: UK players’ full overview of bonuses, payments and mobile app

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

QBet online casino – what UK players need to know

  • By admin
  • October 3, 2026
  • 5 views

كيفية التحقق من حسابك في 1xbet بعد تحميل 1xbet 2025 APK في الإمارات

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views
error: Content is protected !!