चिपळूण रेल्वे स्थानकावर प्रवाशांचे हाल; तिकीट खिडकीची इमारत जीर्णावस्थेत

​चिपळूण : प्रतिनिधी

चिपळूण शहराकडून रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या प्रवाशांची सध्या मोठी गैरसोय होत आहे. कोकण रेल्वे महामंडळाने पूर्वी चिपळूण शहर-मुरादपूर दिशेने येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी तिकीट खिडकीची स्वतंत्र इमारत बांधली होती. सुरुवातीचे काही महिने येथून तिकीट विक्री झाली, मात्र कालांतराने ही खिडकी कायमची बंद पडली. आज ही इमारत जीर्णावस्थेत पोहोचली असून, तिथे अज्ञात परप्रांतीय कामगारांनी बस्तान बसवले आहे. हे कामगार कोणत्या ठेकेदाराचे आहेत याबाबत कोणतीही माहिती नसून रेल्वे प्रशासनही याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहे. इमारतीची दुरवस्था आणि प्रवाशांची गैरसोय पाहता, कोकण रेल्वे अन्याय निवारण संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा माजी सभापती शौकत मुकादम यांनी रेल्वे प्रशासनाकडे यासंदर्भात आवाज उठवला होता.
​मुकादम यांच्या पाठपुराव्यानंतर रेल्वेने चिपळूण शहराबाजूकडील स्थानक आवारात नवीन पर्यायी तिकीट घर सुरू केले. मात्र, काही दिवस सुरू राहिल्यानंतर हे तिकीट घरही आता बंद अवस्थेत असल्याने रेल्वे प्रशासनाने केवळ प्रवाशांची बोळवण करण्यासाठीच ही खिडकी उघडली होती का, असा संतप्त सवाल प्रवाशांमधून विचारला जात आहे. एकीकडे तिकीट खिडकीचा प्रश्न असताना, दुसरीकडे चिपळूण शहराकडून मुरादपूरमार्गे रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणे जिकिरीचे झाले असून, वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रेल्वे प्रशासनाने आणि संबंधित यंत्रणांनी या प्रश्नांकडे तातडीने लक्ष देऊन प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Related Posts

खेड रेल्वे स्थानकावर ‘स्वच्छता हीच सेवा’ अभियानाचा उत्साह; ॲड. वैभव खेडेकरांच्या नेतृत्वाखाली सामूहिक श्रमदान

खेड : प्रतिनिधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा संकल्प अभियान आणि स्वच्छता हीच सेवा-२०२६’ या उपक्रमांतर्गत खेड रेल्वे स्थानक परिसरात भाजपच्या वतीने विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.…

Read more

मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात गोगटे-जोगळेकरच्या तन्वी मोरेला शास्त्रीय गायनात रौप्यपदक!

​रत्नागिरी : प्रतिनिधी मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाविद्यालयाची विद्यार्थिनी तन्वी मोरे हिने शास्त्रीय गायन स्पर्धेत उत्कृष्ट…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

Spelplezier_gegarandeerd_met_chickenroad_en_snelle_reacties_voor_een_veilige_ove-71403370

  • By admin
  • October 6, 2026
  • 0 views

Ludique_laventure_chicken_road_2_offre_un_gameplay_addictif_pour_les_joueurs_hab

  • By admin
  • October 6, 2026
  • 0 views

Tremendous_challenge_awaits_in_the_chicken_road_as_traffic_intensifies_with_each

  • By admin
  • October 5, 2026
  • 3 views

Wettstrategien_entwickeln_und_mit_bets24_im_Sport_erfolgreich_sein

  • By admin
  • October 5, 2026
  • 3 views

Strategies_exploring_pay_by_mobile_options_for_enhanced_customer_journeys

  • By admin
  • October 5, 2026
  • 3 views

Unkomplizierte_Unterhaltung_bietet_das_chicken_road_casino_mit_cleveren_Strategi

  • By admin
  • October 5, 2026
  • 3 views
error: Content is protected !!