विकास सहयोग प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी हेमांगी जोशी; २०२६-२९ साठी नवी कार्यकारिणी जाहीर

मुंबई : प्रतिनिधी
सामाजिक, शैक्षणिक आणि वंचित घटकांच्या उत्थानासाठी गेल्या तीन दशकांपासून अविरत कार्यरत असणाऱ्या ‘विकास सहयोग प्रतिष्ठान’च्या सन २०२६ ते २०२९ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. ठाणे येथे पार पडलेल्या संस्थेच्या सर्वसाधारण सभेत शिक्षण व बालहक्क क्षेत्रातील कार्यकर्त्या हेमांगी जोशी यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाली.
नवनिर्वाचित कार्यकारिणीमध्ये विविध क्षेत्रांतील अनुभवी आणि तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश आहे. संस्थेच्या सचिवपदी सामाजिक उद्योजकता व शाश्वत विकास व्यवस्थापन क्षेत्रातील अभ्यासक सायली राणे, तर खजिनदारपदी तंत्रज्ञान, कायदा व बौद्धिक संपदा क्षेत्रातील तज्ज्ञ ज्ञानेश्वर कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय कार्यकारिणी सदस्य म्हणून संस्थात्मक विकास क्षेत्रातील मार्गदर्शक दत्तात्रय पाटील, आदिवासी व वंचित महिलांच्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या डॉ. वैशाली पाटील, समुदाय संघटक संतोष कांबळे आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र पवार यांची निवड झाली आहे.
गेल्या ३१ वर्षांपासून शिक्षण, महिला सक्षमीकरण, उपजीविका, आदिवासी व वंचित घटकांचे हक्क आणि सामाजिक न्याय या क्षेत्रांत संस्था सक्रियपणे कार्यरत आहे. नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून शिक्षण, तंत्रज्ञान, कायदा आणि समाजकार्य यांचा योग्य मेळ घालून आगामी तीन वर्षांत संस्थात्मक क्षमता अधिक बळकट करण्यात येणार आहे. स्थानिक समुदायांच्या सक्रिय सहभागातून तळागाळातील घटकांपर्यंत विकासाची नवी संधी निर्माण करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहन सुर्वे यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष हेमांगी जोशी व संपूर्ण कार्यकारिणीचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Posts

राज्यातून मान्सूनच्या परतीला वेग; पावसाची उघडीप मिळताच ‘ऑक्टोबर हिट’च्या चटक्याने नागरिक हैराण

मुंबई : राज्यात मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला आता चांगलाच वेग आला असून, येत्या दोन ते तीन दिवसांत मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागांतून मान्सून माघारी फिरण्याची दाट शक्यता आहे. पावसाचा जोर ओसरताच…

Read more

राज ठाकरेंची डरकाळी: ईव्हीएम हटाव, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या; ‘SIR’ प्रक्रिया तातडीने रद्द करण्याची मागणी

मुंबई: मतदार याद्यांच्या विशेष सखोल तपासणी (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेतील कथित गैरव्यवहारावरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. याच मुद्द्यावर आज…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

Tremendous_challenge_awaits_in_the_chicken_road_as_traffic_intensifies_with_each

  • By admin
  • October 5, 2026
  • 3 views

Wettstrategien_entwickeln_und_mit_bets24_im_Sport_erfolgreich_sein

  • By admin
  • October 5, 2026
  • 3 views

Strategies_exploring_pay_by_mobile_options_for_enhanced_customer_journeys

  • By admin
  • October 5, 2026
  • 3 views

Unkomplizierte_Unterhaltung_bietet_das_chicken_road_casino_mit_cleveren_Strategi

  • By admin
  • October 5, 2026
  • 3 views

BuyScenicSD.com Overview and Options

  • By admin
  • October 5, 2026
  • 3 views

Télécharger 1xbet pour Android – dernière version française : ce qu’il faut savoir

  • By admin
  • October 5, 2026
  • 3 views
error: Content is protected !!