ई-पीक पाहणीच्या डीसीएस ॲपमध्ये हापूससह प्रमुख आंबा जातींचा समावेश करा; कृषी विभागाची आयुक्तालयाकडे मागणी

रत्नागिरी : प्रतिनिधी
आंबा उत्पादक शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करताना विविध आंबा जातींची अचूक आणि स्वतंत्र नोंद करता यावी, यासाठी डीसीएस (DCS) ॲपमध्ये आंबा पिकाच्या विविध जातींचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे. रत्नागिरीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी यासंदर्भात थेट कृषी आयुक्तालयाला पत्र पाठवून या तांत्रिक बदलाची मागणी केली आहे.
सध्या डीसीएस ॲपद्वारे ई-पीक पाहणी करताना आंबा पिकाच्या नोंदीसाठी केवळ ‘Seed Variety’ हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे. मात्र, कोकणातील आणि राज्यातील प्रमुख आंबा जातींची नावे स्वतंत्रपणे ॲपमध्ये उपलब्ध नसल्यामुळे प्रत्यक्ष बागेतील पिकाची अचूक नोंद करताना शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण होत आहेत. ही अडचण दूर करण्यासाठी कोकणातील जगप्रसिद्ध हापूससह केशर, रत्ना, सिंधू आणि पायरी या महत्त्वाच्या आंबा जातींचा डीसीएस ॲपमध्ये स्वतंत्र पर्याय म्हणून तातडीने समावेश करावा, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
आंब्यासोबतच कोकणातील प्रमुख बागायती फळपिके असलेल्या काजू, नारळ आणि सुपारी या पिकांच्या सर्व महत्त्वाच्या जातींचाही ॲपमध्ये समावेश करण्याची विनंती कृषी विभागाकडे करण्यात आली आहे. विविध वाणांची स्वतंत्र नोंद करण्याची सुविधा ॲपमध्ये उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची आकडेवारी अधिक अचूकपणे गोळा होईल, ज्यामुळे ई-पीक पाहणीची संपूर्ण प्रक्रिया अधिक परिणामकारक आणि पारदर्शक होण्यास मोठी मदत होणार आहे.

Related Posts

खेड रेल्वे स्थानकावर ‘स्वच्छता हीच सेवा’ अभियानाचा उत्साह; ॲड. वैभव खेडेकरांच्या नेतृत्वाखाली सामूहिक श्रमदान

खेड : प्रतिनिधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा संकल्प अभियान आणि स्वच्छता हीच सेवा-२०२६’ या उपक्रमांतर्गत खेड रेल्वे स्थानक परिसरात भाजपच्या वतीने विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.…

Read more

मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात गोगटे-जोगळेकरच्या तन्वी मोरेला शास्त्रीय गायनात रौप्यपदक!

​रत्नागिरी : प्रतिनिधी मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाविद्यालयाची विद्यार्थिनी तन्वी मोरे हिने शास्त्रीय गायन स्पर्धेत उत्कृष्ट…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

Tremendous_challenge_awaits_in_the_chicken_road_as_traffic_intensifies_with_each

  • By admin
  • October 5, 2026
  • 3 views

Wettstrategien_entwickeln_und_mit_bets24_im_Sport_erfolgreich_sein

  • By admin
  • October 5, 2026
  • 3 views

Strategies_exploring_pay_by_mobile_options_for_enhanced_customer_journeys

  • By admin
  • October 5, 2026
  • 3 views

Unkomplizierte_Unterhaltung_bietet_das_chicken_road_casino_mit_cleveren_Strategi

  • By admin
  • October 5, 2026
  • 3 views

BuyScenicSD.com Overview and Options

  • By admin
  • October 5, 2026
  • 3 views

Télécharger 1xbet pour Android – dernière version française : ce qu’il faut savoir

  • By admin
  • October 5, 2026
  • 3 views
error: Content is protected !!