सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरणी पोलीस अधीक्षक तुषार दोशी सक्तीच्या रजेवर; वैशाली कडुकर यांच्याकडे पदभार
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी झालेल्या राड्याप्रकरणी गृह विभागाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असून, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्याकडे जिल्ह्याचा पदभार सोपवण्यात आला आहे. विधीमंडळात गाजलेल्या या प्रकरणाने पोलीस आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
Read more

