‘नको अटी, नको शर्ती; संपूर्ण कर्जमुक्ती द्या!’; शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी शिवसेनेची मराठवाड्यात भव्य ‘बळीराजा गर्जना ट्रॅक्टर रॅली’

महाराष्ट्रातील अस्मानी व सुल्तानी संकटांनी पिचलेल्या शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्तीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. मंगळवार, १६ जून रोजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मराठवाड्यात ‘बळीराजा गर्जना ट्रॅक्टर रॅली’ काढण्यात आली. ‘नको अटी – नको शर्ती, आम्हाला द्या संपूर्ण कर्जमुक्ती’ या घोषणेखाली हजारो शेतकरी आपल्या ट्रॅक्टरसह जिल्हाधिकारी कार्यालयांवर धडकले आहेत.

Read more

error: Content is protected !!