कुर्धे येथील बांधकामाधीन पूल कोसळून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू, रत्नागिरी तालुक्यातील दुर्दैवी घटना
रत्नागिरी तालुक्यातील कुर्धे येथे साकव योजनेअंतर्गत सुरू असलेल्या बांधकामाधीन पुलाचा जड स्लॅब अंगावर कोसळून अक्षय शिवाजी काटे या २६ वर्षीय तरुण सुपरवायझरचा जागीच मृत्यू झाला. मुसळधार पावसानंतर नदीपात्रात अडकलेला कचरा काढत असताना ही दुर्दैवी घटना घडली असून, पूल कोसळल्यामुळे परिसरातील १०० हून अधिक ग्रामस्थांचा संपर्क तुटला आहे.
Read more


