रत्नागिरीत डॉक्टरला इन्स्टाग्रामवरील फोटोद्वारे ब्लॅकमेल करून खंडणी उकळणारे लांजातील दोन्ही संशयित जेरबंद

राजापूर तालुक्यातील वडदहसोळ येथील एका डॉक्टरच्या इन्स्टाग्रामवरील फोटोंचा गैरवापर करून बदनामीच्या धमकीद्वारे २ लाख २५ हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या आणि त्यापैकी २५ हजार रुपये उकळणाऱ्या लांजा तालुक्यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, ऑनलाइन उकळलेली रक्कम पीडित डॉक्टरला परत मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

Read more

दापोलीत अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमुळे संतापाचा भडका; दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी

दापोली तालुक्यात लागोपाठ घडलेल्या अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. दोषींना फाशीची शिक्षा देण्याच्या आणि पीडितांना न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी ‘निवेदिता प्रतिष्ठान’ व दापोलीकरांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.

Read more

रत्नागिरीत गोवंशीय मांसाची बेकायदेशीर वाहतूक व साठा उघड; स्थानिक गुन्हे शाखेकडून एकाला अटक

रत्नागिरीतील उद्यमनगर परिसरात विनापरवाना गोवंशीय मांसाची बेकायदेशीर वाहतूक आणि साठा केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) धडक कारवाई करत लियाकत शौकत दावत याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ५१ किलो ५०० ग्रॅम गोवंशीय मांस, दुचाकी आणि डीप फ्रीझर असा एकूण १ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read more

खेडमध्ये मानवी अवशेष आढळल्याने खळबळ

खेड जवळील साखरोली पेट्रोल पंपाजवळ मानवी अवशेष (हाडे) सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अवशेष ताब्यात घेतले असून अधिक तपासासाठी कळबणी रुग्णालयात पाठवले आहेत.

Read more

खेडमध्ये जंगली प्राण्यांच्या शिकारीसाठी ठेवलेल्या गावठी बॉम्बचा भीषण स्फोट; १३ वर्षीय मुलगा गंभीर जखमी

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुरडे गोठलवाडी येथे जंगली प्राण्यांच्या शिकारीसाठी ठेवण्यात आलेल्या गावठी बॉम्बचा भीषण स्फोट होऊन १३ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. खेड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून श्वान पथकाच्या मदतीने परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे.

Read more

हर्णेत दोन गटांत तुंबळ हाणामारी; ऐतिहासिक गोवा किल्ला परिसरात वादानंतर तणाव, संतप्त नागरिकांचे जोरदार ‘रास्ता रोको’

दापोलीतील हर्णे येथील ऐतिहासिक भुईकोट गोवा किल्ला परिसरात मंगळवारी किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर बुधवारी दोन गटांत हिंसक हाणामारी झाली. किल्ल्यावर गैरवर्तन करणाऱ्यांना हटकल्याचा राग मनात धरून २५-३० जणांच्या टोळक्याने दोन स्थानिक युवकांवर जीवघेणा हल्ला केला. या घटनेच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी हर्णेत जोरदार ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Read more

सुरज झोरे हत्याकांड: मुख्य आरोपीची मैत्रीण पोलिसांसमोर हजर, तपासाला वेग

रत्नागिरीतील खळबळजनक सुरज झोरे हत्याकांडात एक मोठी घडामोड समोर आली असून, या गुन्ह्याची मुख्य प्रत्यक्षदर्शी आणि संशयित आरोपीची मैत्रीण अखेर मुंबईतून पोलिसांसमोर हजर झाली आहे. पोलिसांनी तिला थेट घटनास्थळी नेऊन पंचनामा केला असून, या प्रकरणी अटकेत असलेल्या तिन्ही आरोपींना २ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. जुना आर्थिक वाद आणि मैत्रिणीला भडकवल्याच्या रागातून हा खून झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

Read more

दीपक भागवत मारहाण प्रकरण; स्वप्ना यादव यांचा मोबाईल तपासात, सीडीआर अहवालाकडे लक्ष

पत्रकार दीपक भागवत मारहाण प्रकरणात तांत्रिक तपासाला वेग आला असून, पोलिसांनी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांचा मोबाईल ताब्यात घेतला आहे. संशयितांच्या कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) अहवालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून, यातून प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Read more

error: Content is protected !!