शक्तिपीठ महामार्गावरून कोल्हापुरात संताप; ‘समर्थक लोकप्रतिनिधींनी मोजणीला येऊनच दाखवावे

कोल्हापूर:
शक्तिपीठ महामार्गावरून शेतकरी आणि प्रशासनातील संघर्ष आता अधिकच तीव्र झाला आहे. सत्ताधारी पक्षाच्या अनेक आमदार आणि खासदारांनी शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला असताना, या प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या शहरातील लोकप्रतिनिधींनी आता जमिनीच्या मोजणीवेळी प्रत्यक्ष येऊनच दाखवावे, शेतकरी त्यांना त्यांचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाहीत, असा थेट आणि आक्रमक इशारा शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीने दिला आहे. सोमवारी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो शेतकऱ्यांनी एकत्र येत प्रशासनाकडून बजावण्यात आलेल्या नोटिसांची होळी केली. यावेळी झालेल्या जोरदार घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
​या आंदोलनादरम्यान विशेषतः आमदार राजेश क्षीरसागर यांच्या भूमिकेवर कडाडून टीका करण्यात आली. त्यांच्या शेतकरीविरोधी वक्तव्याचा आणि भूमिकेचा आंदोलकांनी आणि विविध वक्त्यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, आमदार संतोष बांगर, विनय कोरे, चंद्रदीप नरके आणि राजेंद्र पाटील-यड्रावकर यांसारख्या प्रमुख नेत्यांनी शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका घेत त्यांना पाठिंबा दिला आहे. याच नेत्यांचा आदर्श घेऊन आमदार क्षीरसागर यांनीही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन संघर्ष समितीकडून करण्यात आले. याप्रसंगी विजय देवणे, बाबासाहेब देवकर, गिरीश फोंडे आणि सम्राट मोरे यांच्यासह अनेक नेत्यांनी मनोगत व्यक्त करत शेतकऱ्यांच्या लढ्याला बळ दिले.

Related Posts

नाशिक हादरलं! संत निवृत्तीनाथ देवस्थानचे अध्यक्ष राहुल साळुंखे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा

नाशिक : वारकऱ्यांचे श्रद्धास्थान आणि ‘प्रति पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर येथील श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधी देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. राहुल साळुंखे यांच्यावर बलात्काराचा अत्यंत गंभीर गुन्हा दाखल झाला आहे.…

Read more

ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! उपनेते शरद कोळींवर MPDA अंतर्गत कारवाई; १ वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध

सोलापूर: सत्ताधाऱ्यांच्या टीकेला अत्यंत आक्रमक आणि ‘जशास तसे’ उत्तर देणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उपनेते शरद विठ्ठल कोळी यांच्यावर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शरद कोळी यांच्यावर…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

Fantasierijke_collecties_onthullen_de_schoonheid_van_luckygem_en_persoonlijke_ve

  • By admin
  • October 5, 2026
  • 2 views

Մելա Բեթ – Վաստակում Ապահորի Գայթակգզմունքը

  • By admin
  • October 5, 2026
  • 0 views

Innowacyjne_metody_gry_w_kasynie_online_od_strategii_po_bonusy_z_https_magnetic-

  • By admin
  • October 5, 2026
  • 2 views

Opcje_gry_magneticslotscasinos_com_pl_w_bezpiecznym_i_odpowiedzialnym_środowisk

  • By admin
  • October 5, 2026
  • 2 views

Fantastische_mogelijkheden_verkennen_met_luckygem_voor_een_onvergetelijke_tijd

  • By admin
  • October 5, 2026
  • 2 views

Fantastische_mogelijkheden_met_https_luckygemcasinos1_nl_voor_een_onvergetelijke-70348691

  • By admin
  • October 5, 2026
  • 2 views
error: Content is protected !!