मुंबई वॉटर मेट्रो व सिंधुदुर्ग जलयान निर्मितीसाठी सामंजस्य करार; नितेश राणे यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी

मुंबई : 

राज्यातील सागरी वाहतूक अधिक आधुनिक, पर्यावरणपूरक आणि आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकत मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी अत्याधुनिक जलवाहने उपलब्ध करून देण्यासाठी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलयान निर्मिती सुविधा विकसित करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ (MMB) व मेसर्स झोया मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात मंत्रालयात सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षरी करण्यात आली आहे. मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या करारादरम्यान त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करण्यावर विशेष भर दिला जात आहे. मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी अत्याधुनिक जलवाहने उपलब्ध करून देण्यासोबतच, सिंधुदुर्गमध्ये इलेक्ट्रिक बोट निर्मिती उद्योगाच्या स्थापनेमुळे राज्याच्या सागरी अर्थव्यवस्थेला एक नवीन बळ मिळेल, ज्यामुळे स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील आणि आधुनिक जलयान निर्मितीला चालना मिळेल.

या सामंजस्य करारानुसार, मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी आवश्यक असलेली आधुनिक आणि पर्यावरणपूरक जलवाहने उपलब्ध करून दिली जातील. दुसरीकडे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील तळवणे येथे सुमारे बावीस एकर जमिनीवर जवळपास १५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून एक अत्याधुनिक इलेक्ट्रिक बोट निर्मिती कारखाना स्थापन केला जाईल. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात हरित सागरी वाहतुकीला चालना मिळण्यासोबतच जलयान निर्मितीच्या क्षेत्रात नवीन आणि प्रगत तंत्रज्ञानाचा वापर वाढेल. या ऐतिहासिक प्रसंगी परिवहन आणि बंदरे विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय सेठी, महाराष्ट्र सागरी मंडळाचे वरिष्ठ अधिकारी, मेसर्स झोया मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संचालक जॉन फर्नांडिस, संचालक सूरज देवाढिया, अंबर आयंदे आणि डॉ. निलेश बानवलीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Related Posts

शिवाजी पार्कमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! सीजेपीच्या आंदोलनात ‘जय श्री राम’च्या घोषणा; पोलिसांच्या तत्परतेमुळे टळला अनर्थ

मुंबई: दादरच्या ऐतिहासिक शिवाजी पार्क परिसरात कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) आंदोलन सुरू असतानाच अचानक भगवे मफलर घातलेले काही कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ‘जय श्री राम’च्या जोरदार घोषणा द्यायला सुरुवात…

Read more

पॅनकार्ड क्लब घोटाळ्यात ईडीची मोठी कारवाई: ६४६.५८ कोटी रुपयांच्या २११ मालमत्ता जप्त

मुंबई: सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बहुचर्चित पॅनकार्ड क्लब घोटाळ्यात एक मोठी आणि कठोर कारवाई करत ६४६.५८ कोटी रुपयांच्या तब्बल २११ मालमत्ता जप्त केल्या आहेत. या कारवाईअंतर्गत ईडीने महाराष्ट्रासह देशातील नऊ राज्ये…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

How to Register on the 1Win Argentina App – Step-by-Step Guide

  • By admin
  • October 4, 2026
  • 3 views

Mr Jones online casino – what to know

  • By admin
  • October 3, 2026
  • 5 views

Mr Jones Casino payment methods – instant UK deposits & fast withdrawals

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

QBet login guide for UK players – registration steps, security & mobile access

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

QBet Casino guide: UK players’ full overview of bonuses, payments and mobile app

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

QBet online casino – what UK players need to know

  • By admin
  • October 3, 2026
  • 5 views
error: Content is protected !!