निषेधार्ह… स्मार्ट मीटरवरील चर्चेमुळे पत्रकारावर गुन्हा! महावितरणकडून शंका निरसनाऐवजी माध्यमांची गळचेपी

सावंतवाडी : स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून ग्राहकांच्या मनात असलेल्या शंकांचे निरसन करण्याऐवजी, या विषयावर चर्चा घडवून आणणाऱ्या माध्यमांचाच आवाज दडपण्याचा धक्कादायक प्रकार महावितरणच्या कृतीतून समोर आला आहे. ‘कोकणसाद’ युट्युब न्यूज चॅनेलचे संपादक सागर चव्हाण आणि ग्राहक प्रतिनिधी नंदन वेंगुर्लेकर यांच्यावर सावंतवाडी पोलीस ठाण्यात थेट फौजदारी गुन्हे दाखल करून महावितरणने माध्यमांची मुस्कटदाबी केल्याची टीका आता पत्रकार संघटना आणि नागरिकांमधून होत आहे.

कोकणसाद युट्युब चॅनेलवर नुकतेच स्मार्ट मीटर संदर्भात एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात महावितरणचे अधिकारी आणि ग्राहक प्रतिनिधी दोघांनाही आपली बाजू मांडण्याची समान संधी देण्यात आली होती. या चर्चेदरम्यान ग्राहक प्रतिनिधीने स्मार्ट मीटरमध्ये ‘कॅमेरा’ असल्याचा दावा केला. चर्चेचे सूत्रसंचालन जुहिली पांगम या करत होत्या. लोकशाहीत माध्यमांचे काम जनतेच्या शंका आणि प्रशासनाची बाजू समाजासमोर आणणे हे असते. मात्र, या दाव्याचे खापर थेट चॅनेलच्या संपादकांवर फोडत महावितरणने त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले. केवळ सोशल मीडियावर चर्चेचे रील प्रसारित केल्याच्या कारणावरून गुन्हेगारी पद्धतीने धमकावणे, भीती पसरवणे असे गंभीर आरोप एका पत्रकारावर लावणे, हा कायद्याचा आणि अधिकारांचा गैरवापर असल्याचे मत सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.

चर्चेतील एखाद्या वक्तव्यावर आक्षेप असल्यास प्रशासनाने आपले अधिकृत स्पष्टीकरण किंवा खुलासा लोकांपर्यंत पोहोचवणे कायदेशीरदृष्ट्या अपेक्षित असते. परंतु, थेट फौजदारी कारवाईचा बडगा उगारून महावितरणने स्मार्ट मीटरच्या विरोधात प्रश्न विचारणाऱ्यांना आणि त्यांना व्यासपीठ देणाऱ्या माध्यमांना एकप्रकारे दहशत दाखवण्याचाच प्रयत्न केला आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांवर गुन्हे दाखल करण्याच्या या दडपशाही प्रवृत्तीमुळे महावितरणच्या पारदर्शकतेवरच आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या संपूर्ण घटनेचा पत्रकार संघटनांकडून तीव्र शब्दांत निषेध नोंदवण्यात आला आहे. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर झालेला हा हल्ला खपवून घेतला जाणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया माध्यम क्षेत्रातून व्यक्त होत आहे. महावितरणच्या या हुकूमशाही आणि गळचेपीच्या विरोधात आता राज्यभर तीव्र निषेध नोंदवण्यात येणार असल्याची ठाम भूमिका पत्रकार संघटनांनी घेतली असून, पत्रकारांवर दाखल केलेले हे अन्यायकारक गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत, अशी मागणी जोर धरत आहे.

पत्रकार संघटना आक्रमक !

दरम्यान महावितरण कडून पत्रकार सागर चव्हाण यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा हा माध्यमांची गळचेपी असून ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड सर्कल या घटनेचा तीव्र निषेध करत आहे. सरकार कडून माध्यमांची गळचेपी अजिबात सहन केली जाणार नाही. सागर चव्हाण यांच्यामागे संघटना ठामपणे उभी राहील. या कृतीचा आम्ही राज्यभर निषेध नोंदवू तसेच गुन्हा मागे घेई पर्यंत संघटना गप्प बसणार नाही, असा इशारा अध्यक्ष यसिन पटेल, सचिव होनकळसे, उपाध्यक्ष गणेश गोडसे, अभिमन्यु लोंढे, सत्यवान विचारे आदी केंद्रीय समिति तसेच अन्य पदाधिकार्‍यांनी दिला आहे.

मीडिया असोशिएशन ऑफ इंडिया या पत्रकार संघटनेने देखील घटनेचा निषेध व्यक्त केला असून महावितरणने केलेली तक्रार मागे घ्यायला भाग पडणारच, अशी भूमिका संघटनेच्या अध्यक्षा शीतल करदेकर यांनी घेतली आहे.

अन्य पत्रकार संघटना देखील आक्रमक झाल्या असून विविध स्तरातून आपला निषेध व्यक्त केला आहे.

Related Posts

आंबोलीत मोठी दुर्घटना: महादेवगड पॉईंटवरून ४०० फूट खोल दरीत कोसळून पर्यटकाचा करुण अंत

वर्षा पर्यटनासाठी आंबोलीतील महादेवगड पॉईंटवर आलेल्या बेळगाव येथील एका पर्यटकाचा ४०० फूट खोल दरीत कोसळून दुर्दैवी अंत झाला आहे. सह्याद्री ॲडव्हेंचर रेस्क्यू टीम आणि पोलिसांनी अत्यंत कठीण परिस्थितीत शोधमोहीम राबवत त्यांचा मृतदेह बाहेर काढला.

Read more

मुंबई वॉटर मेट्रो व सिंधुदुर्ग जलयान निर्मितीसाठी सामंजस्य करार; नितेश राणे यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी

मुंबई वॉटर मेट्रो आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे १५० कोटी रुपयांच्या इलेक्ट्रिक बोट निर्मिती कारखान्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ व झोया मरीन सर्व्हिसेस दरम्यान मंत्रालयात सामंजस्य करार करण्यात आला.

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

How to Register on the 1Win Argentina App – Step-by-Step Guide

  • By admin
  • October 4, 2026
  • 2 views

Mr Jones online casino – what to know

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

Mr Jones Casino payment methods – instant UK deposits & fast withdrawals

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

QBet login guide for UK players – registration steps, security & mobile access

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

QBet Casino guide: UK players’ full overview of bonuses, payments and mobile app

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

QBet online casino – what UK players need to know

  • By admin
  • October 3, 2026
  • 5 views
error: Content is protected !!