मुंबई-गोवा महामार्गावर तुरळ येथे भीषण अपघात; रस्त्याच्या कडेला उभ्या कंटेनरला टेम्पोची जोरदार धडक, कोल्हापूरचा चालक गंभीर जखमी

संगमेश्वर: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील तूरळ येथील गणपती मंदिराजवळ शुक्रवारी दुपारी एक भीषण अपघात घडला असून एका भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली आहे. ही धडक इतकी भीषण होती की धडकेनंतर टेम्पो महामार्गावरच पलटी झाला आणि त्याच्या केबिनचा पूर्णपणे चेंदामेंदा होऊन कोल्हापूर येथील चालक रितेश पाटील हा रक्ताच्या थारोळ्यात केबिनमध्येच अडकून पडला होता. अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी आणि पत्रकार मिलिंद चव्हाण यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेत मोठ्या शर्थीच्या प्रयत्नाने चालकाला केबिनमधून बाहेर काढले आणि तात्काळ १०८ रुग्णवाहिकेद्वारे संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, परंतु त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरळीत केली असली, तरी मुंबई-गोवा महामार्गावरील आरवली ते तळेकांटे या पट्ट्यात सातत्याने वाढणाऱ्या भीषण अपघातांमुळे वाहनचालकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित प्रशासनाने या मृत्यूच्या सापळ्यावर तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Related Posts

संगमेश्वरजवळ मध्यरात्री कारचा भीषण अपघात; तीन जण जखमी, मोठा अनर्थ टळला

संगमेश्वर : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वरनजीक वांद्री-सप्तलिंगी पुलाजवळ गुरुवारी मध्यरात्री एका भरधाव कारचा भीषण अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगतच्या मोठ्या दगडावर आदळून उलटली. या थरारक अपघातात…

Read more

देवरुख: इन्स्टाग्रामवरील संशयास्पद APK फाईलमुळे तरुणाची ५५ हजारांची ऑनलाईन फसवणूक

देवरुख : प्रतिनिधी सोशल मीडियावरून अज्ञात लिंक किंवा फाईल्स डाऊनलोड करणे किती धोक्याचे ठरू शकते, याचा धक्कादायक प्रकार संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथे उघडकीस आला आहे. इन्स्टाग्रामवरून आलेली संशयास्पद एपीके (APK)…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

Mr Jones online casino – what to know

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

Mr Jones Casino payment methods – instant UK deposits & fast withdrawals

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

QBet login guide for UK players – registration steps, security & mobile access

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

QBet Casino guide: UK players’ full overview of bonuses, payments and mobile app

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

QBet online casino – what UK players need to know

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

كيفية التحقق من حسابك في 1xbet بعد تحميل 1xbet 2025 APK في الإمارات

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views
error: Content is protected !!