मुंबई कोस्टल रोडवर भीषण अपघात; भरधाव बीएमडब्ल्यू पुलावरून कोसळून तीन तरुणांचा मृत्यू

मुंबई : प्रतिनिधी

मुंबईच्या कोस्टल रोडवर पहाटेच्या सुमारास एका भरधाव बीएमडब्ल्यू (BMW) कारचा भीषण अपघात झाला असून, यामध्ये तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना लाला कॉलेजसमोरील लोटस जेटीजवळ पहाटे ५.२० वाजता घडली. मरीन ड्राईव्हवरून हाजी अलीच्या दिशेने जाणारी डीडी०१-सी-६३०२ (DD01-C-6302) या क्रमांकाची बीएमडब्ल्यू कार कोस्टल रोडच्या कडेला असलेल्या डिव्हायडर आणि इलेक्ट्रिक पोलला जोरदार धडकून पुलावरून थेट खाली कोसळली.
या भीषण अपघातात धैर्य दर्शन शेठ (१७), आदित्य जकासनिया (१९) आणि शमय गजर (२१) या तीन तरुणांना आपला जीव गमवावा लागला. तर, आदित्य कल्पेश्वर ओसवाल (२३) हा तरुण गंभीर जखमी झाला असून, नायर रुग्णालयात त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. अपघातग्रस्त बीएमडब्ल्यू कार दादरा आणि नगर हवेली येथे फाल्गुन गजर यांच्या नावावर नोंदणीकृत असून, मृतांपैकी एकाचे ते नातेवाईक आहेत. हे सर्व मृत आणि जखमी तरुण मूळचे अहमदाबादचे रहिवासी असून, शिक्षणासाठी ते मुंबईतील जुहू आणि कुर्ला येथे राहत होते.
या दर्दनाक अपघाताचा पुढील तपास ताडदेव पोलीस करत आहेत. ताडदेव पोलिसांच्या सीनियर पोलीस इन्स्पेक्टर मीना जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात अपघाताच्या वेळी बीएमडब्ल्यू कारचा वेग ताशी २०० किलोमीटरपेक्षा जास्त असल्याचे समोर आले आहे. अतिवेगामुळे चालकाचे स्टीअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, संपूर्ण तपासानंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Related Posts

राज्यातून मान्सूनच्या परतीला वेग; पावसाची उघडीप मिळताच ‘ऑक्टोबर हिट’च्या चटक्याने नागरिक हैराण

मुंबई : राज्यात मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला आता चांगलाच वेग आला असून, येत्या दोन ते तीन दिवसांत मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागांतून मान्सून माघारी फिरण्याची दाट शक्यता आहे. पावसाचा जोर ओसरताच…

Read more

राज ठाकरेंची डरकाळी: ईव्हीएम हटाव, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या; ‘SIR’ प्रक्रिया तातडीने रद्द करण्याची मागणी

मुंबई: मतदार याद्यांच्या विशेष सखोल तपासणी (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेतील कथित गैरव्यवहारावरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. याच मुद्द्यावर आज…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

Fantastische_mogelijkheden_verkennen_met_luckygem_voor_een_onvergetelijke_tijd

  • By admin
  • October 5, 2026
  • 0 views

Fantastische_mogelijkheden_met_https_luckygemcasinos1_nl_voor_een_onvergetelijke-70348691

  • By admin
  • October 5, 2026
  • 1 views

Exceptional_fortune_with_Lucky_Wave_and_immersive_casino_experiences_awaits_you

  • By admin
  • October 5, 2026
  • 2 views

Fascynujące_możliwości_gry_online_z_https_magneticslotscasino_com_pl_i_prakty

  • By admin
  • October 5, 2026
  • 1 views

Fantastyczne_rekomendacje_i_magneticslotscasino_net_pl_zapewniają_niezapomniane

  • By admin
  • October 5, 2026
  • 1 views

Spieler in Casino Dortmund gewinnen mit Glück und Strategie

  • By admin
  • October 5, 2026
  • 2 views
error: Content is protected !!