कुर्धे पूल दुर्घटना: शिवसेना (उबाठा) आक्रमक; सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याची मागणी

रत्नागिरी : प्रतिनिधी

तालुक्यातील कुर्धे येथे (लिंगायतवाडी ते खोताचीवाडी दरम्यान) नदीवर जिल्हा परिषद बांधकाम कंत्राटदाराकडून पुलाचे काम सुरू असताना झालेल्या मोठ्या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष कमालीचा आक्रमक झाला आहे. या अवैध आणि बोगस बांधकामाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीचे निवेदन रत्नागिरी तालुकाप्रमुख मयुरेश्वर पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांना सुपूर्द करण्यात आले.

मंगळवारी पुलाचा काँक्रीटचा भाग कोसळून एका निष्पाप कामगाराचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब ही समोर आली आहे की, या बांधकामाचे कोणतेही अंदाजपत्रक (बजेट), प्रशासकीय मंजुरी, निविदा (टेंडर) किंवा वर्क ऑर्डर अस्तित्वातच नव्हती. “कोणतीही अधिकृत परवानगी नसताना कंत्राटदाराने नेमक्या कोणाच्या आदेशावरून हे काम सुरू केले होते?” असा अत्यंत तिखट सवाल शिवसेनेने या निवेदनाद्वारे उपस्थित केला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी कंत्राटदारांची मनमानी आणि बोगस कामे सुरू असल्याचा आरोप करत शिवसेनेने पुढील मागण्या केल्या आहेत:

  • अशा अवैध कामांना भविष्यात कोणतीही मंजुरी किंवा निधी दिला जाऊ नये.

  • विनापरवानगी काम करणाऱ्या संबंधित कंत्राटदाराची नोंदणी (लायसन्स) त्वरित रद्द करण्यात यावी.

  • या भ्रष्टाचारात जिल्हा परिषदेचे अधिकारीही सामील असल्याचे आढळल्यास, त्यांच्यावरही कडक कायदेशीर कारवाई करून त्याचा लेखी अहवाल सादर करावा.

हे निवेदन देताना शिवसेना आणि युवासेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत, उपतालुकाप्रमुख विजय देसाई, उपशहरप्रमुख सलील डाफळे, विभागप्रमुख किरण तोडणकर, साजिद पासवकर, उपविभागप्रमुख सचिन सावंतदेसाई, अजिंक्य सनगरे आणि आदेश (आबू) भाटकर आदींचा समावेश होता.

Related Posts

रत्नागिरीत जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेचा थरार; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी : प्रतिनिधी रत्नागिरीत आज पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेला विद्यार्थ्यांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कसोप ते कोळंबे फाटा या मार्गावर ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. जिल्हा क्रीडा…

Read more

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सुवर्णझेप: ६००० कोटींच्या एकत्रित व्यवसायाचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण

रत्नागिरी : प्रतिनिधी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपल्या यशाची घोडदौड कायम राखत ३० सप्टेंबर २०२६ अखेर तब्बल ६००० कोटी रुपयांच्या एकत्रित व्यवसायाचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. ग्राहकांचा दृढ…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

New Hopa Casino account verification guide for UK players

  • By admin
  • October 5, 2026
  • 1 views

PlayGrand UK steps and methods

  • By admin
  • October 5, 2026
  • 1 views

PlayGrand sign in steps and methods – Full UK guide

  • By admin
  • October 5, 2026
  • 1 views

PlayGrand Casino – What UK Players Need to Know

  • By admin
  • October 5, 2026
  • 1 views

PlayGrand Casino Review – Account Verification, Bonuses, Payments & Mobile Guide for UK Players

  • By admin
  • October 5, 2026
  • 1 views

Laadukas_atefia_ratkaisu_tarjoaa_kattavat_työkalut_ja_luotettavan_suojan_digita

  • By admin
  • October 4, 2026
  • 1 views
error: Content is protected !!