कळव्यात मुसळधार पावसामुळे रस्त्यावर झाड कोसळले; दोन गाड्यांचा चक्काचूर, मुंब्र्याकडे जाणारी वाहतूक दोन तास ठप्प!

ठाणे : अशोक घाग

बुधवारी सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कळव्यातील मुंबई-पुणे रस्त्यावरील आशेर सोसायटीजवळ, चायनीज सेंटर शेजारी असलेले एक भलेमोठे काटेरी बाभळीचे झाड अचानक कोसळले. बुधवार (ता. १) दुपारी एकच्या सुमारास घडलेल्या या घटनेत तिथे उभ्या असलेल्या दोन चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मुख्य रस्त्यावरच झाड पडल्यामुळे मुंब्र्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या एका बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आणि जवळपास दोन तास प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यामुळे मुंब्र्याकडे जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचा जागच्या जागी खोळंबा झाला. या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न केले, तर दुसरीकडे घटनेची माहिती मिळताच कळवा प्रभाग समिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि गाड्यांवर पडलेले झाड कापून बाजूला करत रस्ता साफ केला.

Related Posts

बाळू पूर्णेकर हत्याकांड: “नगरसेवक पद वाचवण्यासाठीच काटा काढला”, भास्कर जाधवांचा सरकारवर घणाघात

ठाणे : प्रतिनिधी मानपाडा परिसरातील शिवसेना (ठाकरे गट) विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी शिवसेना नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी अत्यंत खळबळजनक आरोप केला आहे. येथील स्थानिक नगरसेविकेचा…

Read more

बाळू पूर्णेकर हत्याकांडात मोठे खुलासे! गोळीबार करणारा नीलेश पवार; संशयित ‘लावण्य’ची एसआयटीकडून चौकशी

ठाणे: मानपाडा परिसरातील शिवसेना (ठाकरे गट) विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी तपासाला वेग आला असून, पोलिसांच्या हाती नवे धागेदोरे लागले आहेत. या जीवघेण्या हल्ल्यात नीलेश पवार याने पूर्णेकरांवर…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

Geweldige_kansen_en_betrouwbare_informatie_over_https_zombillioncasinos-netherla

  • By admin
  • October 6, 2026
  • 0 views

Αξιολόγηση_κριτηρίων_παιχνιδιού_και_ασφάλε-72507116

  • By admin
  • October 6, 2026
  • 1 views

Effectieve_strategieën_en_https_the-westaces-nl_nl_voor_succesvolle_projectplan

  • By admin
  • October 6, 2026
  • 2 views

Excellent_options_for_players_seeking_kingdomcasino_rewards_and_exceptional_casi

  • By admin
  • October 6, 2026
  • 2 views

Mr Luck mobile app guide for UK players

  • By admin
  • October 6, 2026
  • 2 views

mrluck payment methods guide for UK players – deposits & withdrawals

  • By admin
  • October 6, 2026
  • 2 views
error: Content is protected !!