शासकीय कामकाजात ‘एआय’चा प्रभावी वापर करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (AI) बाजारपेठ आणि रोजगाराचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. या पार्श्वभूमीवर, अधिक सज्ज आणि सक्षम प्रशासन उभारण्यासाठी राज्य शासनाने आता शासकीय कामकाजात ‘एआय’च्या (Artificial Intelligence) प्रभावी वापरावर भर देण्यास सुरुवात केली आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुंबईत आयोजित ‘नॅसकॉम टेक्नॉलॉजी अँड लीडरशिप फोरम २०२६’ (NASSCOM Technology and Leadership Forum 2026) या प्रतिष्ठित कार्यक्रमात ते बोलत होते. या चर्चासत्रात ज्येष्ठ पत्रकार विष्णू सोम यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी राज्याची तंत्रज्ञान विषयक भूमिका स्पष्ट केली. या महत्त्वपूर्ण सत्रात मायक्रोसॉफ्ट इंडियाच्या अध्यक्षा सिंधू गंगाधरन आणि पीडब्ल्यूसीचे (PwC) अध्यक्ष संजीव कृष्णन हेदेखील सहभागी झाले होते.

शासन यंत्रणेत एआयचा वापर वाढवून अधिक सक्षम डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा उभारण्यावर राज्य सरकारचा भर असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. राज्यातील शैक्षणिक संस्था आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील समन्वय वाढवून भविष्यातील आव्हानांसाठी ‘एआय-सक्षम’ मनुष्यबळ तयार करण्यासाठी शासन स्तरावर वेगाने काम सुरू आहे. बदलत्या तंत्रज्ञानामुळे रोजगाराच्या संधींचे स्वरूपही बदलत आहे. त्यामुळे आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये काळानुसार आवश्यक ते बदल करण्यासाठी लवकरच मुंबईत राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांसाठी एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

शासन, विविध शैक्षणिक संस्था आणि नॅसकॉमसारख्या नामांकित उद्योग संघटनांनी एकत्रितपणे काम केल्यास महाराष्ट्र राज्य ‘एआय’ क्षेत्रात देशात अधिक वेगाने आणि ठामपणे पुढे जाऊ शकेल, असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

Related Posts

मुंबई: सीजेपीचे विनापरवानगी ‘जेल भरो’ आंदोलन, ५०० आंदोलकांवर एफआयआर (FIR) दाखल

मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) मुंबईतील शिवाजी पार्क येथे केलेले आंदोलन त्यांना महागात पडले आहे. गांधी जयंतीच्या मुहूर्तावर पोलिसांची परवानगी नसतानाही…

Read more

भारताची सागरी क्षमता मजबूत करण्यासाठी ‘एससीआय’ने आघाडीची भूमिका बजवावी: केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल

मुंबई: केंद्रीय बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SCI) ला आवाहन केले आहे की, त्यांनी स्वावलंबी आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक जहाज बांधणी व…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

New Hopa Casino account verification guide for UK players

  • By admin
  • October 5, 2026
  • 0 views

PlayGrand UK steps and methods

  • By admin
  • October 5, 2026
  • 0 views

PlayGrand sign in steps and methods – Full UK guide

  • By admin
  • October 5, 2026
  • 0 views

PlayGrand Casino – What UK Players Need to Know

  • By admin
  • October 5, 2026
  • 0 views

PlayGrand Casino Review – Account Verification, Bonuses, Payments & Mobile Guide for UK Players

  • By admin
  • October 5, 2026
  • 0 views

Laadukas_atefia_ratkaisu_tarjoaa_kattavat_työkalut_ja_luotettavan_suojan_digita

  • By admin
  • October 4, 2026
  • 1 views
error: Content is protected !!