दापोली-खेड महामार्गावर दुचाकी घसरून नाल्यात कोसळल्याने तरुणीचा मृत्यू; दुसरी गंभीर जखमी

दापोली:
दापोली-खेड महामार्गावरील वाकवली-शिरशिंगे फाट्याजवळ मंगळवारी सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान एक अत्यंत दुर्दैवी अपघात घडला. दापोलीकडून खेडच्या दिशेने जाणाऱ्या दोन तरुणींच्या दुचाकीवरील ताबा सुटल्याने त्यांची गाडी रस्त्याकडच्या नाल्यात कोसळली.
​या भीषण दुर्घटनेमध्ये २२ वर्षीय सेजल पांडुरंग भागवत हिचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दुसरी तरुणी वैष्णवी चंद्रकांत अहिरे ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
​अपघाताचा मोठा आवाज ऐकताच परिसरातील स्थानिकांनी व ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. तसेच, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला.
​दरम्यान, या महामार्गावरील निकृष्ट दर्जाचे काम, मोऱ्यांजवळ साचलेला गाळ आणि पाण्याचा योग्य निचरा न झाल्यामुळेच ही दुर्दैवी दुर्घटना घडल्याचा गंभीर आरोप स्थानिकांनी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. तसेच, याप्रकरणी संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी तीव्र मागणी आता जोर धरत आहे.

Related Posts

संगमेश्वरजवळ मध्यरात्री कारचा भीषण अपघात; तीन जण जखमी, मोठा अनर्थ टळला

संगमेश्वर : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वरनजीक वांद्री-सप्तलिंगी पुलाजवळ गुरुवारी मध्यरात्री एका भरधाव कारचा भीषण अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगतच्या मोठ्या दगडावर आदळून उलटली. या थरारक अपघातात…

Read more

देवरुख: इन्स्टाग्रामवरील संशयास्पद APK फाईलमुळे तरुणाची ५५ हजारांची ऑनलाईन फसवणूक

देवरुख : प्रतिनिधी सोशल मीडियावरून अज्ञात लिंक किंवा फाईल्स डाऊनलोड करणे किती धोक्याचे ठरू शकते, याचा धक्कादायक प्रकार संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथे उघडकीस आला आहे. इन्स्टाग्रामवरून आलेली संशयास्पद एपीके (APK)…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

How to Register on the 1Win Argentina App – Step-by-Step Guide

  • By admin
  • October 4, 2026
  • 2 views

Mr Jones online casino – what to know

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

Mr Jones Casino payment methods – instant UK deposits & fast withdrawals

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

QBet login guide for UK players – registration steps, security & mobile access

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

QBet Casino guide: UK players’ full overview of bonuses, payments and mobile app

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

QBet online casino – what UK players need to know

  • By admin
  • October 3, 2026
  • 5 views
error: Content is protected !!