गरीबांच्या आरोग्य हक्कासाठी आमदार शेखर निकम विधानसभेत आक्रमक; आयुष्मान आणि जनआरोग्य योजनेत पारदर्शकतेची मागणी

मुंबई : सर्वसामान्य, गरीब आणि गरजू रुग्णांना शासनाच्या मोफत आरोग्य योजनांचा लाभ सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने मिळावा, यासाठी आमदार शेखर निकम यांनी चालू पावसाळी अधिवेशनात आवाज उठवला असून आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटींवर बोट ठेवत त्यांनी सभागृहात महत्त्वपूर्ण सुधारणांची मागणी केली आहे. अनेकदा रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना त्यांच्या आजारासाठी नेमके किती रुपयांचे पॅकेज मंजूर झाले, उपचारासाठी प्रत्यक्षात किती खर्च झाला आणि त्यांच्या कार्डवरून किती रक्कम वजा झाली, याची कोणतीही पूर्वकल्पना दिली जात नसल्याची बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. आरोग्य योजनांमधील हा पारदर्शकतेचा अभाव दूर करण्यासाठी आमदार निकम यांनी प्रत्येक उपचारानंतर रुग्णाच्या नातेवाईकांना मंजूर पॅकेज व खर्चाची सविस्तर माहिती लेखी स्वरूपात देणे, योजनांतर्गत समाविष्ट रुग्णालयांचे नियमित ऑडिट करणे, हेल्थ कार्डवरील वापरलेली व शिल्लक रक्कम लाभार्थ्याला ‘SMS’ द्वारे तत्काळ कळवणे तसेच रुग्णालयांकडून होणाऱ्या अडवणुकीच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी यंत्रणा अधिक गतिमान व सक्षम करावी, अशा अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना शासनाला केल्या आहेत. गरीब आणि वंचित घटकांच्या आरोग्य हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आमदार शेखर निकम यांनी अभ्यासूपणे मांडलेल्या या मुद्द्याचे सभागृहातील इतर सदस्यांनीही समर्थन केले असून, सर्वसामान्य जनतेतून व विविध स्तरांतून त्यांच्या या भूमिकेचे जोरदार स्वागत होत आहे.

Related Posts

शिवाजी पार्कमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! सीजेपीच्या आंदोलनात ‘जय श्री राम’च्या घोषणा; पोलिसांच्या तत्परतेमुळे टळला अनर्थ

मुंबई: दादरच्या ऐतिहासिक शिवाजी पार्क परिसरात कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) आंदोलन सुरू असतानाच अचानक भगवे मफलर घातलेले काही कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ‘जय श्री राम’च्या जोरदार घोषणा द्यायला सुरुवात…

Read more

पॅनकार्ड क्लब घोटाळ्यात ईडीची मोठी कारवाई: ६४६.५८ कोटी रुपयांच्या २११ मालमत्ता जप्त

मुंबई: सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बहुचर्चित पॅनकार्ड क्लब घोटाळ्यात एक मोठी आणि कठोर कारवाई करत ६४६.५८ कोटी रुपयांच्या तब्बल २११ मालमत्ता जप्त केल्या आहेत. या कारवाईअंतर्गत ईडीने महाराष्ट्रासह देशातील नऊ राज्ये…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

Betti slots registration steps – quick sign‑up guide for UK players

  • By admin
  • October 4, 2026
  • 2 views

Betti UK Security Guide – Licensing, Player Protection & Safe Play

  • By admin
  • October 4, 2026
  • 2 views

Betti withdrawal: what to know

  • By admin
  • October 4, 2026
  • 2 views

Betti Casino UK Review – Bonuses, Payments, Mobile App & Security Overview

  • By admin
  • October 4, 2026
  • 2 views

Roletto legit? UK review of licensing, verification, bonuses & payments

  • By admin
  • October 4, 2026
  • 2 views

How to Register on the 1Win Argentina App – Step-by-Step Guide

  • By admin
  • October 4, 2026
  • 3 views
error: Content is protected !!