मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपुरात आषाढीची शासकीय महापूजा; पंढरपूर कॉरिडॉर अडीच वर्षांत पूर्ण होणार

पंढरपूर:

आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह सपत्नीक संपन्न केली. तसेच धाराशिव जिल्ह्यातील गौरगाव येथील मानाचे वारकरी बाबासाहेब माधव माने आणि प्रभावती बाबासाहेब माने या दाम्पत्यालाही या महापूजेचा मान मिळाला.
श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दरवर्षी वाढणारी भक्तांची अफाट गर्दी लक्षात घेता, भाविकांच्या उत्तम सोयीसाठी मंदिर परिसर विकासाचे काम ‘पंढरपूर कॉरिडॉर’च्या माध्यमातून हाती घेण्यात येणार आहे. कोणावरही अन्याय न करता सर्वांचे योग्य पुनर्वसन करून हे महत्त्वाकांक्षी विकासाचे काम आगामी अडीच वर्षांत पूर्ण केले जाईल, अशी महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आयोजित सत्कारसमारंभात ते बोलत होते.
महापूजेनंतर आयोजित सत्कार समारंभात शासकीय महापूजेचे मानाचे वारकरी दाम्पत्य बाबासाहेब माधव माने आणि प्रभावती माने (मु.पो. गौरगाव, ता. कळंब, जि. धाराशिव) यांचा मुख्यमंत्री व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या वारकरी दाम्पत्याला एसटी महामंडळाकडून वर्षभर मोफत एसटी प्रवासाचा पास देखील वितरित करण्यात आला.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दिंड्यांना ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थान (कौंडण्यपूर), द्वितीय क्रमांक वारकरी धर्मसंकीर्तन सेवा प्रतिष्ठान (जालना) आणि तृतीय क्रमांक गोऱ्हेकर संस्था (आळंदी देवाची) यांना गौरवचिन्ह व धनादेश प्रदान करण्यात आला.
या सोहळ्याला पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर, अमृता फडणवीस, आमदार समाधान आवताडे, राजेंद्र राऊत, सुरेश खाडे, बापूसाहेब पठारे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांच्यासह मंदिर समितीचे सर्व आदरणीय सदस्य उपस्थित होते.

Related Posts

नाशिक हादरलं! संत निवृत्तीनाथ देवस्थानचे अध्यक्ष राहुल साळुंखे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा

नाशिक : वारकऱ्यांचे श्रद्धास्थान आणि ‘प्रति पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर येथील श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधी देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. राहुल साळुंखे यांच्यावर बलात्काराचा अत्यंत गंभीर गुन्हा दाखल झाला आहे.…

Read more

ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! उपनेते शरद कोळींवर MPDA अंतर्गत कारवाई; १ वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध

सोलापूर: सत्ताधाऱ्यांच्या टीकेला अत्यंत आक्रमक आणि ‘जशास तसे’ उत्तर देणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उपनेते शरद विठ्ठल कोळी यांच्यावर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शरद कोळी यांच्यावर…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

Opcje_gry_magneticslotscasinos_com_pl_w_bezpiecznym_i_odpowiedzialnym_środowisk

  • By admin
  • October 5, 2026
  • 0 views

Fantastische_mogelijkheden_verkennen_met_luckygem_voor_een_onvergetelijke_tijd

  • By admin
  • October 5, 2026
  • 0 views

Fantastische_mogelijkheden_met_https_luckygemcasinos1_nl_voor_een_onvergetelijke-70348691

  • By admin
  • October 5, 2026
  • 2 views

Exceptional_fortune_with_Lucky_Wave_and_immersive_casino_experiences_awaits_you

  • By admin
  • October 5, 2026
  • 2 views

Fascynujące_możliwości_gry_online_z_https_magneticslotscasino_com_pl_i_prakty

  • By admin
  • October 5, 2026
  • 2 views

Fantastyczne_rekomendacje_i_magneticslotscasino_net_pl_zapewniają_niezapomniane

  • By admin
  • October 5, 2026
  • 2 views
error: Content is protected !!