कर्नाटकात लवकरच नेतृत्वबदल; सिद्धरामय्यांच्या जागी डी.के. शिवकुमार मुख्यमंत्री होणार?

कर्नाटक : कर्नाटकच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची शक्यता असून, मुख्यमंत्री सिद्धरामय्या येत्या शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवली जाण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेस नेतृत्वाने ७७ वर्षीय सिद्धरामय्या यांना राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची भूमिका आणि राज्यसभेची जागा देण्याचे आश्वासन दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीनंतर कर्नाटकात सत्तावाटपाचा ‘अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला’ लागू करण्यासाठी शिवकुमार गटाकडून सिद्धरामय्यांवर दबाव वाढवला जात आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, के.सी. वेणुगोपाल आणि रणदीप सुरजेवाला यांच्या उपस्थितीत सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यासोबत दिवसभर मॅरेथॉन बैठक पार पडली. अधिकृत अजेंड्यानुसार ही बैठक राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारांवर चर्चेसाठी आयोजित करण्यात आली होती, परंतु प्रत्यक्षात राज्यातील सत्तासमीकरणांवरच सर्वाधिक चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या बैठकीनंतर सिद्धरामय्या यांनी आपल्या निकटधर्मीय मंत्र्यांसोबत स्वतंत्र बैठक घेतल्याने या चर्चांना अधिक उधाण आले आहे. दरम्यान, काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल यांनी या सर्व चर्चा केवळ तर्क-वितर्क असल्याचे म्हटले असून, बैठकीत नेतृत्वबदलावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे, तर स्वतः सिद्धरामय्या यांनीही या वृत्ताला दुजोरा देण्यास नकार दिला आहे.

Related Posts

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण: राजकीय स्वार्थापोटी मला गोवण्याचा प्रयत्न; माजी महापौर मीनाक्षी शिंदेंचे सडेतोड प्रत्युत्तर

ठाणे : अशोक घाग प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येशी माझा किंवा माझ्या कुटुंबाचा काडीमात्र संबंध नाही. केवळ राजकीय फायद्यासाठी ‘टाळूवरचे लोणी खाण्याचा’ हा निंदनीय प्रकार सुरू असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत…

Read more

‘सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून आपले वेद वदवून घेत आहेत’; राज ठाकरेंचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर घणाघात

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयोगाच्या एकूणच कार्यपद्धतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. संत ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद वदवल्याच्या ऐतिहासिक दाखल्याचा संदर्भ देत…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

Laadukas_atefia_ratkaisu_tarjoaa_kattavat_työkalut_ja_luotettavan_suojan_digita

  • By admin
  • October 4, 2026
  • 1 views

Conceptualización_avanzada_sobre_el_legado_crusado_y_su_influencia_perdurable

  • By admin
  • October 4, 2026
  • 1 views

रत्नागिरीत जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेचा थरार; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

  • By admin
  • October 3, 2026
  • 3 views
रत्नागिरीत जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेचा थरार; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सुवर्णझेप: ६००० कोटींच्या एकत्रित व्यवसायाचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण

  • By admin
  • October 3, 2026
  • 2 views
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सुवर्णझेप: ६००० कोटींच्या एकत्रित व्यवसायाचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी रत्नागिरीत ५ ऑक्टोबरला काँग्रेसचा मूक मोर्चा

  • By admin
  • October 3, 2026
  • 3 views
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी रत्नागिरीत ५ ऑक्टोबरला काँग्रेसचा मूक मोर्चा

चिपळूण: दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या मागणीसाठी ७ ऑक्टोबरला ‘इंडिया आघाडी’चा विराट मोर्चा

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views
चिपळूण: दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या मागणीसाठी ७ ऑक्टोबरला ‘इंडिया आघाडी’चा विराट मोर्चा
error: Content is protected !!