स्मृतिदिन विशेष; सामाजिक, राजकीय कार्यातही ‘यशवंत’…

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष कै. यशवंतराव तथा दादा माने यांनी १९६२ पासून जनसंघाचे काम सुरू केले. १९८० पासून भाजप सुरू केला व त्यामुळे ६२ ते ८६ या काळात जनसंघ, भाजप जिल्ह्यात रुजवला. १९७९ मध्ये पं. स. समितीचे अध्यक्ष असताना दादांनी विकासकामांचा धडाका लावला. तेव्हा रुजवलेले भाजपच्या विचारांचे रोपटे जोमाने बहरले. दादा पुलोद सरकारमध्ये मत्स्योद्योग महामंडळाचे चेअरमन (कॅबिनेट दर्जा) होते. भाजप व दादांच्या विचारांना मानणारा मोठा वर्ग आज रत्नागिरीमध्ये आहे. दादांचा उद्या (ता. २) स्मृतिदिन आहे. त्यांच्या कार्याविषयी…

यशवंतराव तथा दादा माने यांचा जन्म १३ मे १९२२ रोजी झाला. त्यांचे शिक्षण मुंबईत रुईया कॉलेजला झाले. मिऱ्या गावचे मंत्री (कै.) पी. के. तथा बाळासाहेब सावंत हे नेते असल्याने त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव दादांवर होता. वडिल भिकाजीराव हे शेअर बाजारात नोकरीला होते. दादांनी १९५४ मध्ये पारंपरिक रापणीचा व्यवसाय सुरू केला. मराठ्यांच्या मुलांनी व्यवसाय केला पाहिजे, या हेतूने त्यांनी मालवण, कारवार येथील मच्छीमार गोळा केले. हा व्यवसाय सचोटी, प्रामाणिकपणे १९७५ पर्यंत चालू ठेवला.

रा. स्व. संघाचे डॉ. बापूराव केतकर हे मिऱ्या येथे दवाखाना चालवत. त्यांची दादांसोबत ओळख झाली व ते संघ विचारांशी जोडले गेले. तसेच डॉ. ज. शं. केळकर यांचे भाऊ विसूभाऊ हे यशवंतरावांचे वर्गमित्र असल्याने ते जनसंघात सक्रिय झाले. १९६२ ला यशवंतराव हे मिऱ्याचे सरपंच झाले आणि तालुका पंचायत समितीचे सभापती १९८० मध्ये झाले. या पदावर काम करताना त्यांनी सामान्यांच्या अडचणी सोडविण्यास प्राधान्य दिले. जिल्ह्याचा दौरा करून ते तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचले. गावागावांत प्राथमिक शाळा सुरू केल्या. पं. स. माध्यमातून अनेक गावांमध्ये शिक्षण, आरोग्य सुविधा दिल्या. दादा १९७५ मध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष झाले आणि भाजपची नवी ओळख जिल्ह्याला होऊ लागली. खासदार बापूसाहेब परुळेकर, रामदासभाई देशपांडे, बापूराव केतकर, माजी आमदार (कै.) तात्यासाहेब नातू, (कै.) जनुभाऊ काळे, फुलवाले भाऊजी मांडवकर, यांच्यासह अनेक सहकारी एकोप्याने काम करत होते. या साऱ्यांनी विकासकामांचा धडाका लावला आणि भाजप गावोगावी रुजू लागला.

दादांचे निधन २ जानेवारी १९८६ रोजी झाले. भाजप आणि जनतेचा जणू आधारच हरवला. दादांनी त्यांच्या संस्कारांची, विचारांची शिदोरी त्यांच्या सुपुत्रांकडे सोपवली होती. बाळासाहेब माने हे महाविद्यालयीन शिक्षण घेत शेवटच्या वर्षाला होते. वडिलांनी खांद्यावर सोपवलेली जबाबदारी आता आपल्यालाच पुढे न्यायची आहे, याची जाण त्या लहान वयातही बाळासाहेबांना होती. वडिलांचा सामाजिक व शैक्षणिक कार्याचा वसा पुढे नेण्यासाठी बाळासाहेबांनी अपार कष्ट केले. अवघ्या ८ वर्षातच त्यांनी १९९४ मध्ये रत्नसिंधू शिक्षण प्रसारक संस्था व १९९५ मध्ये यश फाऊंडेशन स्थापन केली. एमआयडीसीमध्ये यशवंत प्राथमिक विद्यालय सुरू केले व वंचित मुलांना येथे शिक्षणाची संधी मिळाली. १९९७ मध्ये निवळी तिठा येथे ‘कै. यशवंतराव माने माध्यमिक विद्यालय’ सुरू केले. २००६ मध्ये कोकणातील पहिले नर्सिंग कॉलेज सुरू केले. दहावीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस लागावी, यासाठी सन २००० पासून यशवंत एसएससी मार्गदर्शन व्याख्यानमाला सुरू केली. आतापर्यंत ६० हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. दादांचा वसा बाळासाहेब पुढे चालवत आहेत.

—ॲड. भाऊ शेट्ये  , जिल्हाध्यक्ष (अधिवक्ता परिषद, रत्नागिरी)

Related Posts

संपादकीय: ‘जेन झी’चा विजय, लोकशाही पर्वाची नांदी?

दिल्लीतील जंतरमंतरवरील ऐतिहासिक ‘जेन झी’ आंदोलनासमोर झुकत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना दिलेला राजीनामा हा गेल्या तेरा वर्षांच्या दडपशाहीच्या राजकारणाचा पराभव आहे. विद्यार्थ्यांच्या अभूतपूर्व संयम आणि निर्भयतेमुळे सत्तेच्या मग्रुरीला चपराक बसली असून, हा विजय भारतीय लोकशाहीतील एका नव्या पर्वाची नांदी ठरणार आहे.

Read more

अग्रलेख : शिक्षणाचा ‘इव्हेंट’ आणि वास्तवाचा विसर!

पहिलीची पावले उत्साहाने शाळेकडे वळली खरी, पण नेत्यांच्या ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ने या निरागस आनंदावर प्रसिद्धीची धूळ उडवली. गळके छत, अपुरे शिक्षक आणि पायाभूत सुविधांचा अभाव असलेल्या ग्रामीण शाळांचे विदारक वास्तव मांडणारा आणि शिक्षण व्यवस्थेच्या ‘खेळखंडोबा’वर बोट ठेवणारा एक परखड अग्रलेख.

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

Laadukas_atefia_ratkaisu_tarjoaa_kattavat_työkalut_ja_luotettavan_suojan_digita

  • By admin
  • October 4, 2026
  • 1 views

Conceptualización_avanzada_sobre_el_legado_crusado_y_su_influencia_perdurable

  • By admin
  • October 4, 2026
  • 1 views

रत्नागिरीत जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेचा थरार; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

  • By admin
  • October 3, 2026
  • 3 views
रत्नागिरीत जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेचा थरार; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सुवर्णझेप: ६००० कोटींच्या एकत्रित व्यवसायाचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण

  • By admin
  • October 3, 2026
  • 2 views
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सुवर्णझेप: ६००० कोटींच्या एकत्रित व्यवसायाचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी रत्नागिरीत ५ ऑक्टोबरला काँग्रेसचा मूक मोर्चा

  • By admin
  • October 3, 2026
  • 3 views
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी रत्नागिरीत ५ ऑक्टोबरला काँग्रेसचा मूक मोर्चा

चिपळूण: दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या मागणीसाठी ७ ऑक्टोबरला ‘इंडिया आघाडी’चा विराट मोर्चा

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views
चिपळूण: दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या मागणीसाठी ७ ऑक्टोबरला ‘इंडिया आघाडी’चा विराट मोर्चा
error: Content is protected !!