महायुतीचे सहा उमेदवार बिनविरोध; ११ ठिकाणी रंगणार विधान परिषदेची निवडणूक

मुंबई: राज्याच्या विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या असून महायुतीचे ६ वजनदार उमेदवार बिनविरोध निवडून येणार आहेत, तर उर्वरित ११ मतदारसंघांमध्ये येत्या १८ जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार गटाच्या प्रत्येकी दोघांचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजीत पवार गट) प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे (रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग), माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे (पुणे), शिंदेसेनेचे दुष्यंत सतीश चतुर्वेदी (यवतमाळ), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोटातील रवींद्र फाटक (ठाणे), भाजपचे जुनेजाणते अरुण लखानी (वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली) आणि भाजपचे प्राजक्त तनपुरे (अहिल्यानगर) या सहा उमेदवारांसमोर आता कोणीही विरोधक उरलेला नाही.

अहिल्यानगरमध्ये अजित पवार गटाचे नेते तथा अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांच्या माघारीच्या अर्जावर स्वाक्षरीवरून मोठा हायव्होल्टेज ड्रामा रंगला, मात्र भाजप नेत्यांच्या मनधरणीनंतर त्यांनी आक्षेप मागे घेतल्याने प्राजक्त तनपुरे यांची निवड बिनविरोध झाली. दुसरीकडे, उमेदवारांच्या ऐनवेळच्या यू-टर्नमुळे महाविकास आघाडीवर मोठी नामुष्की ओढवली आहे; यवतमाळमध्ये काँग्रेसचे राज्य सरचिटणीस साहेबराव कांबळे, भंडारा मतदारसंघात काँग्रेसचे अधिकृत उमेदवार दिलीप बनसोड, नांदेडमध्ये काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रामदास सुमठाणकर आणि छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघात उद्धवसेनेच्या उमेदवार देवयानी डोणगावकर यांनी अखेरच्या क्षणी माघार घेतल्याने मविआला मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, पूर्ण बंडखोरी शमविण्यात महायुतीला अपयश आले असून नाशिक आणि जळगावमध्ये महायुतीतील मित्रपक्षच एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. नाशिकमध्ये भाजपच्या गणेश गिते यांनी माघार घेतली असली तरी त्यांचे सख्खे बंधू गोकुळ आणि भाजपचे पदाधिकारी बळीराम हिरे यांचे वारस प्रसाद हिरे रिंगणात कायम असल्याने शिंदेसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे, तर जळगावमध्ये शिंदेसेनेच्या नगरसेविका रेश्मा कुंदन काळे यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने तेथे आता चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. या नाट्यमय घडामोडींनंतर आता सांगली-satara, सोलापूर, नागपूर, भंडारा-गोंदिया, अमरावती, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर-जालना, धाराशिव-लातूर-बीड, नांदेड आणि परभणी-हिंगोली या ११ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतील चित्र स्पष्ट झाले असून तेथे १८ जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

Related Posts

शिवाजी पार्कमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! सीजेपीच्या आंदोलनात ‘जय श्री राम’च्या घोषणा; पोलिसांच्या तत्परतेमुळे टळला अनर्थ

मुंबई: दादरच्या ऐतिहासिक शिवाजी पार्क परिसरात कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) आंदोलन सुरू असतानाच अचानक भगवे मफलर घातलेले काही कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ‘जय श्री राम’च्या जोरदार घोषणा द्यायला सुरुवात…

Read more

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण: राजकीय स्वार्थापोटी मला गोवण्याचा प्रयत्न; माजी महापौर मीनाक्षी शिंदेंचे सडेतोड प्रत्युत्तर

ठाणे : अशोक घाग प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येशी माझा किंवा माझ्या कुटुंबाचा काडीमात्र संबंध नाही. केवळ राजकीय फायद्यासाठी ‘टाळूवरचे लोणी खाण्याचा’ हा निंदनीय प्रकार सुरू असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

Mr Jones online casino – what to know

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

Mr Jones Casino payment methods – instant UK deposits & fast withdrawals

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

QBet login guide for UK players – registration steps, security & mobile access

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

QBet Casino guide: UK players’ full overview of bonuses, payments and mobile app

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

QBet online casino – what UK players need to know

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

كيفية التحقق من حسابك في 1xbet بعد تحميل 1xbet 2025 APK في الإمارات

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views
error: Content is protected !!