ठाणे : अशोक घाग
ठाणे शहर पोलीस आयुक्तालय परिसरात घरफोडी करणाऱ्या आरोपीला ठाणे गुन्हे शाखा युनिट 3 ने केली अटक, राजेश अरविंद राजभर असे या आरोपीचे नाव असून त्याच्या कडून सोन्या चांदीचे व रोख रक्कम असा एकुण 38 लाख 50 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त गुन्हे अमरसिंग जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
आरोपी राजेश अरविंद राजभर वय 30 वर्ष मूळ राहणारा आझमगड उत्तरप्रदेश व सध्या राहणार डोंबिवली ह्याला गुन्ह्याच्या घटनास्थळी व परिसरातील सी सी टी व्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषण करून तसेच गुप्त बातमीदारमार्फत मिळालेल्या बातमीवरून कल्याणचे गुन्हे शाखा युनिट 3 चे वरिष्ठ पोलीस अधिकारी अजित शिंदे,सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या पथकाने आजमगढ राज्य उत्तरप्रदेश येथून ताब्यात घेतले, त्याच्या कडे चौकशी केली असता त्याने ठाणे,नवी मुंबई,पालघर, ठाणे ग्रामीण क्षेत्रात घरफोडी करून चोरी केलेले सोन्याचे, चांदीचे, रोख रक्कम त्याची पहिली पत्नी व भाऊ राकेश अरविंद राजभर याच्या कडे ठेवल्याचे सांगितले त्या प्रमाणे त्यांच्या कडून 38 लाख 50 हजाराचा किमतीत मुद्देमाल हस्तगत करण्यात आला तसेच राजेश कडून 21 गुन्हे उघडकीस आणले आहेत, त्याच्या वर यापूर्वी ठाणे पोलीस आयुक्तालय परिक्षेत्रामध्ये एकुण 33 गुन्हे दाखल आहेत, पुढील तपासगुन्हे शाखेचे पोलीस करत आहेत.



