पुण्यात दूध भेसळीचे मोठे रॅकेट उध्वस्त; ६ जिल्ह्यांत छापे टाकत १३ जणांना बेड्या

पुणे ग्रामीण पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाने (FDA) संयुक्त कारवाई करत राज्यातील सर्वात मोठ्या आंतरजिल्हा दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. ६ जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी छापे टाकून १३ जणांना अटक करण्यात आली असून, अडीच कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गेल्या २ वर्षांपासून शाम्पू आणि केमिकलचा वापर करून नामांकित कंपन्यांच्या दुधात घातक भेसळ केली जात होती.

Read more

error: Content is protected !!