रत्नागिरी जिल्ह्याचा डंका! ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमा’त महाराष्ट्रात प्रथम; १०१९ नवउद्योजकांना बळ

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत रत्नागिरी जिल्ह्याने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. जिल्ह्याला देण्यात आलेल्या ७८० प्रकरणांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत १०१९ नवउद्योजकांना कर्ज मंजुरी देऊन प्रशासनाने १३० टक्क्यांहून अधिक यश संपादन केले आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या प्रभावी नियोजनामुळे पर्यटन, प्रक्रिया उद्योग आणि सेवा क्षेत्रातील प्रकल्पांना मोठी चालना मिळाली असून, यामुळे कोकणातील हजारो तरुणांच्या हाताला स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध झाला आहे. जिल्ह्याच्या या यशाचे राज्यभरातून कौतुक होत असून उद्योजकतेच्या क्षेत्रात रत्नागिरीने राज्यासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.

Read more

error: Content is protected !!