‘मी बॉस बोलतोय… त्वरित पैसे ट्रान्सफर करा!’; व्हॉट्सॲप मेसेजवर विश्वास ठेवल्याने कंपनीला २.३६ कोटींचा चुना; पाच तरुण अटकेत, सायबर पोलिसांकडून ‘बॉस स्कॅम’चा पर्दाफाश
कोल्हापुरातील युनिट मोटर्स कंपनीची २ कोटी ३६ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय सायबर गुन्हेगारांना कोल्हापूर सायबर पोलिसांनी गुजरातच्या अहमदाबादमधून अटक केली आहे. ‘बॉस स्कॅम’च्या माध्यमातून उच्चशिक्षित तरुणांनी हा गुन्हा केल्याचे उघडकीस आले असून, पोलिसांनी ८२ लाख रुपये जप्त केले आहेत.
Read more

