आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; आता महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्तपदी नियुक्ती
आपल्या कडक आणि शिस्तप्रिय कार्यपद्धतीसाठी प्रसिद्ध असलेले वरिष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची राज्य सरकारने पुन्हा एकदा बदली केली आहे. त्यांच्या २१ वर्षांच्या कारकिर्दीतील ही २५ वी बदली असून, आता त्यांची महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) विभाग आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही काळापासून वादात असलेल्या एफडीए विभागातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सरकारने हे मोठे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे.
Read more

