जगबुडी नदीने ओलांडली धोक्याची पातळी, खेड शहरात शिरले पूरपाणी; चिपळूणलाही पुराचा धोका
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे खेडमधील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पुराचे पाणी थेट खेड बाजारपेठेत शिरले आहे. नारंगी नदीला पूर आल्याने खेड-दापोली रस्ता बंद झाला असून, चिपळूणमधील बाजार पुलावर पाणी आल्याने चिपळूण शहरावरही पुराचे संकट ओढवले आहे. प्रशासनाने पुढील ४८ तासांसाठी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Read more

