आरटीई प्रवेशात प्रशासनाची मनमानी! खोटे अहवाल बनवून माजी सैनिकाच्या जुळ्या मुलांचा प्रवेश रद्द

खेड तालुक्यातील बोरज येथील एका माजी सैनिकाच्या जुळ्या मुलांचा आरटीई (RTE) अंतर्गत मिळालेला प्रवेश खोटा अहवाल बनवून रद्द केल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. शिक्षण विभागाच्या या मनमानी कारभाराविरोधात माजी सैनिकाच्या पत्नीने जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे तक्रार केली असून, न्याय न मिळाल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. या प्रकरणाने खेडमधील आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Read more

error: Content is protected !!