ओणी-अणुस्कूरा मार्ग गणेशोत्सवापूर्वी दुरुस्त न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा
आंबा घाट बंद असल्याने अवजड वाहतुकीमुळे अत्यंत दुरवस्था झालेल्या ओणी-अणुस्कूरा (राज्यमार्ग १५५) मार्गाची गणेशोत्सवापूर्वी तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. रस्ता दुरुस्त न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा पाचल तालुका निर्मिती कृती समितीने सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
Read more

