मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांचा पुन्हा एल्गार; ३० मे पासून आंतरवाली सराटीत बेमुदत उपोषण
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला असून, आगामी ३० मे पासून जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे बेमुदत आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू करणे, आरक्षणाची सध्याची उपसमिती बरखास्त करणे आणि आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे अशा विविध मागण्यांसाठी त्यांनी सरकारला ३० मे पूर्वीचा अंतिम अल्टिमेटम दिला आहे. या आंदोलनात संपूर्ण मराठा समाज शांततापूर्ण मार्गाने सहभागी होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
Read more

