चिपळूण नागरी पतसंस्थेच्या अडचणीत वाढ?; सहकार राज्यमंत्र्यांकडून कारवाईचे संकेत !

खेड : प्रतिनिधी

खेड येथील माहिती अधिकार कार्यकर्ते रूपेश पवार यांनी दि. १५ ऑगस्ट पासून मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले होते. चिपळूण नागरी पतसंस्था लिमिटेड मध्ये गैरव्यवहार झाल्याचा त्यांचा आरोप आहे. या उपोषणाची दखल घेत सहकार मंत्र्यांचे खाजगी सचिव सुधीर राठोड यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती सहकार राज्यमंत्री मा. पंकज भोयर यांना अवगत केली आहे. तसेच या प्रकरणी उचित कारवाईसाठी अग्रेषित करण्यात आले असल्याचे त्यांनी तक्रारदार यांना लेखी पत्राद्वारे कळवले आहे. त्यामुळे लवकरच चिपळूण नागरी पतसंस्थेवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या विरोधात रुपेश पवार यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले होते. चिपळूण नागरी पतसंस्थेची त्रिसदस्यीय समितीकडून चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. मात्र या समितीचा चौकशी अहवाल अद्याप समोर आलेला नाही. त्यासाठीच रुपेश पवार यांनी उपोषण छेडले होते. पण दरम्यानच्या काळात गणेशोत्सव व सुट्ट्यांचा कालावधी असल्याने काही दिवसांसाठी रुपेश पवार यांनी आपले उपोषण स्थगित केले होते. मात्र पुन्हा दि. २२ ऑगस्ट पासून पुन्हा एकदा रुपेश पवार यांनी आपले उपोषण सुरू केले होते.

त्यावेळी सहकार विभागाने आपण पुढील कारवाई लवकर सुरू करू असे लेखी आश्वासन दिल्यामुळे रुपेश पवार यांनी आपले उपोषण स्थगित केले होते. आता त्यांना सहकार विभागाकडून नुकतेच एक पत्र प्राप्त झाले असून या पत्रामध्ये चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेवर संदर्भ क्रमांक १ चे पत्रावर आधारित उचित कारवाई साठी सहकार विभागाचे प्रधान सचिव मंत्रालय, मुंबई यांना संदर्भ क्रमांक ३ अन्वये अग्रेशित करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच संदर्भ क्रमांक २ चे पत्र उचित कारवाई साठी मा. उपसचिव (सहकार ७ स) मंत्रालय मुंबई यांना संदर्भ क्रमांक ४ अन्वये अग्रेशित करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेवर लवकरच कारवाई केली जाईल अशी आशा आता व्यक्त करण्यात येत आहे.

Related Posts

ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! उपनेते शरद कोळींवर MPDA अंतर्गत कारवाई; १ वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध

सोलापूर: सत्ताधाऱ्यांच्या टीकेला अत्यंत आक्रमक आणि ‘जशास तसे’ उत्तर देणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उपनेते शरद विठ्ठल कोळी यांच्यावर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शरद कोळी यांच्यावर…

Read more

रत्नागिरीत जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेचा थरार; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी : प्रतिनिधी रत्नागिरीत आज पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेला विद्यार्थ्यांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कसोप ते कोळंबे फाटा या मार्गावर ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. जिल्हा क्रीडा…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! उपनेते शरद कोळींवर MPDA अंतर्गत कारवाई; १ वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध

  • By admin
  • October 5, 2026
  • 0 views
ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! उपनेते शरद कोळींवर MPDA अंतर्गत कारवाई; १ वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध

कौटुंबिक वादातून तरुणाने टकमक टोकावरून दरीत उडी घेत संपवले जीवन

  • By admin
  • October 5, 2026
  • 0 views
कौटुंबिक वादातून तरुणाने टकमक टोकावरून दरीत उडी घेत संपवले जीवन

Αξιοπιστία_κερδών_από_την_τύχη_μέχρι_το_slotexo

  • By admin
  • October 5, 2026
  • 0 views

Erlesene_Gewinnchancen_mit_https_luckleopards-de_de_für_ein_fesselndes_Spielerl

  • By admin
  • October 5, 2026
  • 0 views

Notable_platforms_like_luckcasinos-uk_uk_redefine_modern_casino_experiences_for

  • By admin
  • October 5, 2026
  • 1 views

New Hopa Casino account verification guide for UK players

  • By admin
  • October 5, 2026
  • 2 views
error: Content is protected !!