भाजप नेते संतोष साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली खेडमध्ये ‘जनता दरबार’ संपन्न

खेड (प्रतिनिधी) :

तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रलंबित समस्या, गाऱ्हाणी आणि शासकीय कामांमधील अडथळे दूर करण्यासाठी भारतीय जनता पक्ष प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांचे विशेष कार्य अधिकारी संतोष साखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत खेड येथील शासकीय विश्रामगृहात ‘जनता दरबार’ पार पडला. या दरबारात तालुक्यातील अनेक नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या असून, त्या तात्काळ सोडविण्याचे निर्देश साखरे यांनी संबंधित विभागांना दिले.

खेड तालुक्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या कामांसाठी वारंवार शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. ही अडचण लक्षात घेऊन आमदार रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार संतोष साखरे यांनी या जनता दरबाराचे आयोजन केले होते. यावेळी रस्ते विकास, पाण्याचे प्रश्न, वीज पुरवठा आणि महसूल विभागाशी संबंधित तक्रारींचा पाऊस पडला.

प्रशासकीय कामात पारदर्शकता हवी “सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देणे हेच आमचे प्राथमिक कर्तव्य आहे. नागरिकांचे प्रश्न केवळ कागदावर न राहता ते प्रत्यक्षात सुटले पाहिजेत. प्रशासन आणि जनता यांच्यातील दरी कमी करण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे,” असे प्रतिपादन संतोष साखरे यांनी यावेळी केले.

अनेकांना मिळाला तात्काळ दिलासा या जनता दरबारात उपस्थित असलेल्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना साखरे यांनी काही प्रकरणांमध्ये जागीच मार्ग काढण्याच्या सूचना दिल्या. रखडलेल्या शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या उपक्रमामुळे खेडमधील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, साखरे यांच्या या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.

याप्रसंगी स्थानिक भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने खेड तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.

Related Posts

संगमेश्वरजवळ मध्यरात्री कारचा भीषण अपघात; तीन जण जखमी, मोठा अनर्थ टळला

संगमेश्वर : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वरनजीक वांद्री-सप्तलिंगी पुलाजवळ गुरुवारी मध्यरात्री एका भरधाव कारचा भीषण अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगतच्या मोठ्या दगडावर आदळून उलटली. या थरारक अपघातात…

Read more

देवरुख: इन्स्टाग्रामवरील संशयास्पद APK फाईलमुळे तरुणाची ५५ हजारांची ऑनलाईन फसवणूक

देवरुख : प्रतिनिधी सोशल मीडियावरून अज्ञात लिंक किंवा फाईल्स डाऊनलोड करणे किती धोक्याचे ठरू शकते, याचा धक्कादायक प्रकार संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथे उघडकीस आला आहे. इन्स्टाग्रामवरून आलेली संशयास्पद एपीके (APK)…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

Mr Jones online casino – what to know

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

Mr Jones Casino payment methods – instant UK deposits & fast withdrawals

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

QBet login guide for UK players – registration steps, security & mobile access

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

QBet Casino guide: UK players’ full overview of bonuses, payments and mobile app

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

QBet online casino – what UK players need to know

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

كيفية التحقق من حسابك في 1xbet بعد تحميل 1xbet 2025 APK في الإمارات

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views
error: Content is protected !!