रत्नागिरीचा अभिमान! सागर कळंबटे राष्ट्रीय कबड्डी पंच परीक्षेत विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण

रत्नागिरी : प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्याचा सुपुत्र सागर शिवाजी कळंबटे याने राष्ट्रीय कबड्डी पंच परीक्षेत विशेष प्रावीण्यासह यश संपादन करत संपूर्ण कोकणाचा अभिमान उंचावला असून, या उल्लेखनीय यशामुळे आता त्याला राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी स्पर्धांमध्ये अधिकृत पंच म्हणून जबाबदारी पार पाडण्याची संधी मिळणार आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर सागरने हा मानाचा टप्पा गाठला असून अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे हे फळ मानले जात आहे, ज्यामुळे रत्नागिरीच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. सागरच्या कबड्डी प्रवासाची सुरुवात कालिका कला क्रीडा मंडळातून झाली असून सुरुवातीच्या काळात विविध कबड्डी स्पर्धांच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेतल्यानंतर २०१९ मध्ये त्याने जिल्हा कबड्डी पंच परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्यानंतर उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर जिल्हा स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये पंच म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली. यानंतर २०२२ मध्ये राज्य कबड्डी पंच परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने सातत्य कायम ठेवले आणि अखेर २०२६ मध्ये राष्ट्रीय कबड्डी पंच परीक्षेत विशेष प्रावीण्यासह यश मिळवत रत्नागिरीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला. गेल्या सात वर्षांत सागरने तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरीय अनेक कबड्डी स्पर्धांमध्ये पंच म्हणून जबाबदारी पार पाडली असून सांगली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथे झालेल्या विविध स्पर्धांमध्ये त्याच्या अचूक निर्णयक्षमतेचे आणि निष्पक्ष पंचगिरीचे विशेष कौतुक झाले आहे. राष्ट्रीय पंच म्हणून देशभरातील स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत कोकणचे नाव अधिक उज्ज्वल करण्याचा निर्धार सागरने व्यक्त केला असून, यासोबतच भविष्यात आंतरराष्ट्रीय पंच परीक्षा उत्तीर्ण होऊन जागतिक स्तरावर भारत आणि कोकणचे प्रतिनिधित्व करण्याची महत्त्वाकांक्षाही त्याने बोलून दाखवली आहे. सागर कळंबटेच्या या यशामुळे रत्नागिरीसह संपूर्ण कोकणातील क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध क्रीडा संघटना, पदाधिकारी आणि नागरिकांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Posts

संगमेश्वरजवळ मध्यरात्री कारचा भीषण अपघात; तीन जण जखमी, मोठा अनर्थ टळला

संगमेश्वर : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वरनजीक वांद्री-सप्तलिंगी पुलाजवळ गुरुवारी मध्यरात्री एका भरधाव कारचा भीषण अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगतच्या मोठ्या दगडावर आदळून उलटली. या थरारक अपघातात…

Read more

देवरुख: इन्स्टाग्रामवरील संशयास्पद APK फाईलमुळे तरुणाची ५५ हजारांची ऑनलाईन फसवणूक

देवरुख : प्रतिनिधी सोशल मीडियावरून अज्ञात लिंक किंवा फाईल्स डाऊनलोड करणे किती धोक्याचे ठरू शकते, याचा धक्कादायक प्रकार संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथे उघडकीस आला आहे. इन्स्टाग्रामवरून आलेली संशयास्पद एपीके (APK)…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

Betti slots registration steps – quick sign‑up guide for UK players

  • By admin
  • October 4, 2026
  • 2 views

Betti UK Security Guide – Licensing, Player Protection & Safe Play

  • By admin
  • October 4, 2026
  • 2 views

Betti withdrawal: what to know

  • By admin
  • October 4, 2026
  • 2 views

Betti Casino UK Review – Bonuses, Payments, Mobile App & Security Overview

  • By admin
  • October 4, 2026
  • 2 views

Roletto legit? UK review of licensing, verification, bonuses & payments

  • By admin
  • October 4, 2026
  • 2 views

How to Register on the 1Win Argentina App – Step-by-Step Guide

  • By admin
  • October 4, 2026
  • 3 views
error: Content is protected !!