जिल्हास्तरीय तायक्वॉंदो स्पर्धेत लांजाच्या दिपराज खानविलकर आणि तीर्था यादवला सुवर्णपदक

रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय तायक्वॉंदो स्पर्धेत लांजा तालुक्यातील दिपराज युवराज खानविलकर आणि तीर्था गणेश यादव यांनी चमकदार कामगिरी करत आपापल्या गटात सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. त्यांच्या या घवघवीत यशामुळे लांजा तालुक्याच्या क्रीडा वैभवात आणखी भर पडली असून, या दोन्ही खेळाडूंची कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट्स असोसिएशन तसेच राजापूरच्या विविध क्रीडा संस्थांच्या संयुक्त विद्यमाने १० व ११ सप्टेंबर रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत लांजा तालुक्यातून तब्बल ३० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये लांजा येथील न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेजचा अकरावीतील विद्यार्थी दिपराज खानविलकर आणि डी. जे. सामंत स्कूलची विद्यार्थिनी तीर्था यादव यांनी उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांवर मात करत सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. विशेष म्हणजे, या स्पर्धेत लांजातील राष्ट्रीय पंच शितल वीरेंद्र आचरेकर यांनी पंच म्हणून उत्तम जबाबदारी पार पाडली.

या सुवर्णपदक विजेत्या कामगिरीच्या जोरावर आता दिपराज आणि तीर्था हे दोन्ही खेळाडू १ व २ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर येथे रंगणाऱ्या शालेय तायक्वॉंदो विभागीय स्पर्धेत लांजा तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

या लक्षवेधी यशाबद्दल तायक्वॉंदो फिटनेस अकॅडमी, गुरुकुल तायक्वॉंदो स्पोर्ट्स अँड फिटनेस अकॅडमी (लांजा) आणि रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने दोन्ही खेळाडूंचे विशेष अभिनंदन करण्यात आले आहे. अकॅडमीचे अध्यक्ष किशोर यादव, राष्ट्रीय पंच तथा प्रमुख प्रशिक्षिका तेजस्विनी आचरेकर, उपाध्यक्ष अमोल रेडिज यांच्यासह पदाधिकारी, प्रशिक्षक तेजस पावसकर, गौरव खेडेकर, गणेश तोंडारे आणि समस्त लांजावासीयांनी या खेळाडूंचे कौतुक करत त्यांच्या पुढील विभागीय स्पर्धेसाठी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Posts

फळबागायतदारांना हवामान आधारित विमा कवच !

आंबा, काजू, नारळ आणि सुपारी उत्पादकांना मोठा दिलासा रत्नागिरी : प्रतिनिधी बदलत्या हवामानामुळे फळपिकांच्या उत्पादनात होणारी घट आणि त्यामुळे शेतकऱ्यांना सोसावे लागणारे नुकसान लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्ह्यात सन २०२६-२७ या…

Read more

अनधिकृत गॅस कनेक्शन आणि रेशन कार्ड तक्रारींची तात्काळ चौकशी करा; जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश

रत्नागिरी : प्रतिनिधी अनधिकृत गॅस कनेक्शन आणि रेशन कार्ड वाटपासंदर्भात दाखल झालेल्या तक्रारींची अत्यंत सखोल चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करावा, असे स्पष्ट निर्देश रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

Geweldige_kansen_en_betrouwbare_informatie_over_https_zombillioncasinos-netherla

  • By admin
  • October 6, 2026
  • 0 views

Αξιολόγηση_κριτηρίων_παιχνιδιού_και_ασφάλε-72507116

  • By admin
  • October 6, 2026
  • 1 views

Effectieve_strategieën_en_https_the-westaces-nl_nl_voor_succesvolle_projectplan

  • By admin
  • October 6, 2026
  • 2 views

Excellent_options_for_players_seeking_kingdomcasino_rewards_and_exceptional_casi

  • By admin
  • October 6, 2026
  • 2 views

Mr Luck mobile app guide for UK players

  • By admin
  • October 6, 2026
  • 2 views

mrluck payment methods guide for UK players – deposits & withdrawals

  • By admin
  • October 6, 2026
  • 2 views
error: Content is protected !!