भूमी अभिलेख विभागातील ‘ती’ भरती पूर्णपणे बोगस; जिल्हा अधीक्षक सचिन इंगळे यांचे नागरिकांना आवाहन

रत्नागिरी : प्रतिनिधी

सोशल मीडिया आणि इतर डिजिटल माध्यमांवर सध्या भूमी अभिलेख (Land Records) विभागामध्ये नोकरभरती सुरू असल्याच्या काही जाहिराती मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. मात्र, ही भरती प्रक्रिया पूर्णपणे बोगस आणि बनावट असून, नागरिकांनी अशा कोणत्याही फसव्या जाहिरातींना किंवा भूलथापांना बळी पडू नये, असे स्पष्ट आवाहन रत्नागिरीचे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सचिन इंगळे यांनी केले आहे.

सध्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भूमी अभिलेख विभागात नोकरीची सुवर्णसंधी असल्याचे सांगणारे मेसेज आणि जाहिराती फिरत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांची आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी जिल्हा अधीक्षक सचिन इंगळे यांनी एक व्हिडिओ संदेश जारी करून सत्य परिस्थिती समोर आणली आहे.

“अशा प्रकारच्या कोणत्याही बोगस जाहिरातींवर नागरिकांनी अजिबात विश्वास ठेवू नये. जर या जाहिरातींच्या आधारे कोणाला नियुक्ती पत्रे (Appointment Letters) मिळाली असतील, तर त्यांनी थेट भूमी अभिलेख कार्यालयात येऊन त्याची सत्यता तपासून घ्यावी,” असे आवाहन सचिन इंगळे यांनी केले आहे.

नोकरीचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा बोगस जाहिराती पसरवून किंवा बनावट नियुक्ती पत्रांच्या नावाखाली पैशांची मागणी करणाऱ्या लोकांविरुद्ध नागरिकांनी त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा दाखल करावा, असेही जिल्हा अधीक्षकांनी स्पष्ट केले. तसेच शासकीय नोकरभरतीबाबतच्या अधिकृत माहितीसाठी नागरिकांनी केवळ अधिकृत शासकीय संकेतस्थळांचा (Official Websites) किंवा थेट संबंधित कार्यालयाचाच वापर करावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Related Posts

संगमेश्वरजवळ मध्यरात्री कारचा भीषण अपघात; तीन जण जखमी, मोठा अनर्थ टळला

संगमेश्वर : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वरनजीक वांद्री-सप्तलिंगी पुलाजवळ गुरुवारी मध्यरात्री एका भरधाव कारचा भीषण अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगतच्या मोठ्या दगडावर आदळून उलटली. या थरारक अपघातात…

Read more

देवरुख: इन्स्टाग्रामवरील संशयास्पद APK फाईलमुळे तरुणाची ५५ हजारांची ऑनलाईन फसवणूक

देवरुख : प्रतिनिधी सोशल मीडियावरून अज्ञात लिंक किंवा फाईल्स डाऊनलोड करणे किती धोक्याचे ठरू शकते, याचा धक्कादायक प्रकार संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथे उघडकीस आला आहे. इन्स्टाग्रामवरून आलेली संशयास्पद एपीके (APK)…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

Betti slots registration steps – quick sign‑up guide for UK players

  • By admin
  • October 4, 2026
  • 2 views

Betti UK Security Guide – Licensing, Player Protection & Safe Play

  • By admin
  • October 4, 2026
  • 2 views

Betti withdrawal: what to know

  • By admin
  • October 4, 2026
  • 2 views

Betti Casino UK Review – Bonuses, Payments, Mobile App & Security Overview

  • By admin
  • October 4, 2026
  • 2 views

Roletto legit? UK review of licensing, verification, bonuses & payments

  • By admin
  • October 4, 2026
  • 2 views

How to Register on the 1Win Argentina App – Step-by-Step Guide

  • By admin
  • October 4, 2026
  • 3 views
error: Content is protected !!