राजापूर तालुक्यातील अर्जुना धरण शंभर टक्के भरले

राजापूर :

राजापूर तालुक्यातील अर्जुना मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला असून, आज मंगळवार दिनांक २८ जुलै २०२६ रोजी सकाळी ७ वाजेपासून धरणाच्या सांडव्यावरून २.४१ क्युमेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणातील पाण्याची पाणीपातळी १७७.०५ मीटर पोहोचली असून, प्रकल्पाचा उपयुक्त पाणीसाठा ७२.५६ दलघमी म्हणजेच पूर्ण क्षमतेने भरला आहे.
आजच्या दिवसात ७४ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली असून, १ जून २०२६ पासून आतापर्यंत एकूण पर्जन्यमान २००१ मिमी झाले आहे, तर सध्या विमोचक विसर्ग शून्य ठेवण्यात आला आहे.
धरण पूर्ण भरल्यामुळे आणि पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने धरण व त्याच्या अनुषंगिक भागात नागरिकांचा प्रवेश पूर्णपणे निषिद्ध करण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव धरणावर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून, पाटबंधारे प्रकल्प बांधकाम उपविभाग लांजाचे उपअभियंता अमोल एकनाथ बनसोडे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नदीपात्र, नाले तसेच धरणाच्या परिसरात कुणीही जाऊ नये आणि स्वतःची तसेच इतरांची सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी बाळगावी, असे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

Related Posts

संगमेश्वरजवळ मध्यरात्री कारचा भीषण अपघात; तीन जण जखमी, मोठा अनर्थ टळला

संगमेश्वर : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वरनजीक वांद्री-सप्तलिंगी पुलाजवळ गुरुवारी मध्यरात्री एका भरधाव कारचा भीषण अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगतच्या मोठ्या दगडावर आदळून उलटली. या थरारक अपघातात…

Read more

देवरुख: इन्स्टाग्रामवरील संशयास्पद APK फाईलमुळे तरुणाची ५५ हजारांची ऑनलाईन फसवणूक

देवरुख : प्रतिनिधी सोशल मीडियावरून अज्ञात लिंक किंवा फाईल्स डाऊनलोड करणे किती धोक्याचे ठरू शकते, याचा धक्कादायक प्रकार संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथे उघडकीस आला आहे. इन्स्टाग्रामवरून आलेली संशयास्पद एपीके (APK)…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

How to Register on the 1Win Argentina App – Step-by-Step Guide

  • By admin
  • October 4, 2026
  • 2 views

Mr Jones online casino – what to know

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

Mr Jones Casino payment methods – instant UK deposits & fast withdrawals

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

QBet login guide for UK players – registration steps, security & mobile access

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

QBet Casino guide: UK players’ full overview of bonuses, payments and mobile app

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

QBet online casino – what UK players need to know

  • By admin
  • October 3, 2026
  • 5 views
error: Content is protected !!