राज ठाकरेंच्या ‘गुजराती ठेकेदार’ आरोपावर गिरीश महाजनांचा पलटवार; दिले खुले आव्हान

मुंबई : प्रतिनिधी
आगामी कुंभमेळ्याच्या कामांसाठी नाशिकमध्ये अनेक ठिकाणी खोदाई करण्यात आली असून, याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे या कामांचे टेंडर गुजरातमधील ठेकेदारांना देण्यात आल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच केला आहे. ‘महाराष्ट्रात ठेकेदार पैदा झाले नाहीत का?’ असा संतप्त सवाल उपस्थित करत राज ठाकरेंनी हा आरोप केला. यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली असून, खरोखरच नाशिक कुंभमेळ्याचे काम गुजराती ठेकेदारांना दिले आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे. या मुद्द्यावर आता कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर देत थेट आव्हान दिले आहे.
​राज ठाकरेंच्या आरोपांबाबत विचारले असता मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, राज ठाकरे यांचा काहीतरी गैरसमज झाला आहे. शहरात दीड हजार कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. मी त्यांना सर्व कामांची यादी देतो, त्यांनी त्या ठेकेदारांची नावे सांगावीत. आउटर रिंगरोडचे तसेच घाटांची कामे सुरू आहेत, मी यादी देतो, त्यात गुजरातचे किंवा परराज्यातील ठेकेदार कोण आहेत, हे त्यांनी स्पष्ट करावे. ऑनलाईन टेंडर कुणीही भरू शकते, तरीही त्यांनी बाहेरचे ठेकेदार कोण आहेत ते पुराव्यासह सांगावे, असे खुले आव्हान महाजन यांनी दिले आहे. यासोबतच त्यांनी नाशिकमधील मनसेच्या मागील सत्तेवरही जोरदार निशाणा साधला.
​नाशिक महापालिकेतील मनसेच्या पूर्वीच्या सत्तेवर भाष्य करताना महाजन म्हणाले की, नाशिककरांनी त्यांची सत्ता आणि त्यांचे महापौर पाहिले आहेत. तुमचा कार्यकाळ संपल्यानंतर एकही नगरसेवक निवडून आला नाही. जर तुम्ही नाशिकला खरोखरच इतके सुंदर बनवले होते, तर लोकांनी निवडणुकीत असा निकाल का दिला? माझा त्यांना हा सवाल असून याचे उत्तर त्यांनी द्यावे. त्यांनी नाशिकमध्ये काहीही केले नाही, केवळ मोठ्या-मोठ्या गप्पा मारल्या. जर नाशिकला खरोखरच सुंदर बनवले असते, तर किमान तुमचे दोन-चार नगरसेवक तरी निवडून आले असते. जनतेने एकालाही निवडून दिले नाही, यावरूनच तुम्ही काय काम केले हे स्पष्ट होते, असा सणसणीत टोलाही गिरीश महाजन यांनी लगावला.

Related Posts

राज्यातून मान्सूनच्या परतीला वेग; पावसाची उघडीप मिळताच ‘ऑक्टोबर हिट’च्या चटक्याने नागरिक हैराण

मुंबई : राज्यात मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला आता चांगलाच वेग आला असून, येत्या दोन ते तीन दिवसांत मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागांतून मान्सून माघारी फिरण्याची दाट शक्यता आहे. पावसाचा जोर ओसरताच…

Read more

राज ठाकरेंची डरकाळी: ईव्हीएम हटाव, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या; ‘SIR’ प्रक्रिया तातडीने रद्द करण्याची मागणी

मुंबई: मतदार याद्यांच्या विशेष सखोल तपासणी (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेतील कथित गैरव्यवहारावरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. याच मुद्द्यावर आज…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

Fantastische_mogelijkheden_verkennen_met_luckygem_voor_een_onvergetelijke_tijd

  • By admin
  • October 5, 2026
  • 0 views

Fantastische_mogelijkheden_met_https_luckygemcasinos1_nl_voor_een_onvergetelijke-70348691

  • By admin
  • October 5, 2026
  • 1 views

Exceptional_fortune_with_Lucky_Wave_and_immersive_casino_experiences_awaits_you

  • By admin
  • October 5, 2026
  • 2 views

Fascynujące_możliwości_gry_online_z_https_magneticslotscasino_com_pl_i_prakty

  • By admin
  • October 5, 2026
  • 1 views

Fantastyczne_rekomendacje_i_magneticslotscasino_net_pl_zapewniają_niezapomniane

  • By admin
  • October 5, 2026
  • 1 views

Spieler in Casino Dortmund gewinnen mit Glück und Strategie

  • By admin
  • October 5, 2026
  • 2 views
error: Content is protected !!