प्रज्ञानंदने रचला इतिहास! चमत्कारीक पुनरागमन करत जिंकले ग्रँड चेस टूरचे विजेतेपद

नवी दिल्ली :

भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने बुद्धिबळ विश्वात एक नवा इतिहास रचला आहे. ग्रँड चेस टूरच्या अंतिम फेरीत त्याने अव्वल मानांकित फॅबियानो कारुआनाचा एका अत्यंत थरारक लढतीत पराभव करत विजेतेपदावर मोहोर उमटवली. या प्रतिष्ठित स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारा तो पहिलाच भारतीय बुद्धिबळपटू ठरला आहे.
या खिताबी लढतीत प्रज्ञानंदने केलेले पुनरागमन एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हते. अंतिम दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली, तेव्हा तो कारुआनापेक्षा ३-९ अशा स्कोअरसह तब्बल सहा गुणांनी पिछाडीवर होता. त्यावेळी त्याचा विजय जवळपास अशक्य वाटत होता. मात्र, या भारतीय धुरंधराणे शानदार मुसंडी मारत दोन्ही रॅपिड गेम जिंकले आणि स्कोअर ११-९ असा आणला. यानंतर कारुआनानेही जोरदार पलटवार करत दुसरा ब्लिट्झ गेम जिंकला आणि १२-१२ अशी बरोबरी साधली.
प्रचंड दडपण असूनही प्रज्ञानंदने आपला संयम ढळू दिला नाही आणि तिसरा ब्लिट्झ गेम आपल्या नावे केला. आता विजेतेपद जिंकण्यासाठी त्याला शेवटच्या गेममध्ये केवळ एका ड्रॉची (बरोबरीची) आवश्यकता होती, आणि नेमके तेच साध्य करत त्याने या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले.
या ऐतिहासिक विजयानंतर प्रतिक्रिया देताना प्रज्ञानंद म्हणाला, “प्रामाणिकपणे सांगायचे तर, आज मी जिंकू शकेन अशी मला अजिबात अपेक्षा नव्हती. सहा गुणांची तफावत भरून काढणे खूप कठीण असते. फॅबियानोसारख्या दिग्गजाला तुम्ही रोज हरवू शकत नाही.”

Related Posts

Մելա Բեթ – Վաստակում Ապահորի Գայթակգզմունքը

Auto-generated excerpt

Read more

Spieler in Casino Dortmund gewinnen mit Glück und Strategie

Auto-generated excerpt

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

Betoverende_collecties_en_unieke_stenen_bij_lucky-gems-nl_nl_jouw_persoonlijke_j

  • By admin
  • October 5, 2026
  • 2 views

Exceptional_gaming_experiences_featuring_https_luckywave-casinos_uk_offer_substa

  • By admin
  • October 5, 2026
  • 2 views

Fantasierijke_collecties_onthullen_de_schoonheid_van_luckygem_en_persoonlijke_ve

  • By admin
  • October 5, 2026
  • 2 views

Մելա Բեթ – Վաստակում Ապահորի Գայթակգզմունքը

  • By admin
  • October 5, 2026
  • 2 views

Innowacyjne_metody_gry_w_kasynie_online_od_strategii_po_bonusy_z_https_magnetic-

  • By admin
  • October 5, 2026
  • 2 views

Opcje_gry_magneticslotscasinos_com_pl_w_bezpiecznym_i_odpowiedzialnym_środowisk

  • By admin
  • October 5, 2026
  • 2 views
error: Content is protected !!