पुणे हादरले! हडपसरमधील रुग्णालयात ‘टायमर बॉम्ब’ ठेवणाऱ्याला बेड्या; आरोपीचे ‘आरोग्य’ कनेक्शन समोर

पुणे: पुण्यातील हडपसर परिसरातील एका नामांकित खासगी रुग्णालयात बुधवारी सायंकाळी टायमर बॉम्बसदृश वस्तू आढळल्याने मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना पुणे पोलिसांनी काही तासांच्या आत एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक माहितीनुसार या आरोपीचे आरोग्य विभागाशी संबंधित कनेक्शन असल्याचे समोर येत असून त्याने हे कृत्य का केले याचा तपास आता पोलीस करत आहेत.

हडपसरमधील उषाकिरण रुग्णालयातील स्वच्छतागृहाजवळ बुधवारी सायंकाळी जिवंत बॉम्बसदृश वस्तू एका व्यक्तीला आढळली होती. रुग्णालयाचे प्रमुख डॉ. विलास गायकवाड यांनी समयसूचकता दाखवत ती वस्तू स्वतः उचलून बाहेरील मोकळ्या जागेत नेली ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. या वस्तूला सुमारे सात तासांचा टायमर लावलेला होता आणि त्यात जिलेटिनच्या कांड्याही आढळून आल्या होत्या. पुणे पोलीस आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाने (BDDS) रात्री उशिरा ही वस्तू सुरक्षितपणे निकामी केली.

पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक संशयित व्यक्ती इलेक्ट्रिक दुचाकीवरून रुग्णालयात आल्याचे दिसून आले. या व्यक्तीने अतिदक्षता विभागाच्या (ICU) शेजारील स्वच्छतागृहात ही संशयास्पद वस्तू ठेवली होती. या फुटेजच्या आधारे पुणे पोलीस, गुन्हे शाखा आणि एटीएस (ATS) यांनी संयुक्त कारवाई करत संशयित आरोपीला अटक केली आहे. अटकेत असलेला आरोपी आरोग्य विभागाशी संबंधित कामात सक्रिय असल्याचे समजते. त्याने ही वस्तू तिथे का ठेवली आणि त्यामागे कोणाचा कट होता का याबाबत पोलीस सखोल चौकशी करत आहेत. या घटनेमुळे पुण्यातील सार्वजनिक ठिकाणच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Related Posts

कोल्हापूरमध्ये सावकारीचा जाच: ६ लाखांच्या कर्जापोटी उकळले अडीच कोटी, २ वर्षांच्या चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न

कोल्हापूर: महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये खाजगी सावकारांची मुजोरी आणि अत्याचाराचे एक अत्यंत धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका महिला अभियंत्याने (इंजिनिअर) ६ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते, ज्याच्या बदल्यात तिने सावकाराला तब्बल…

Read more

‘नशामुक्त नवी मुंबई’ मोहीम : ७२६ किलो अंमली पदार्थ केले नष्ट

नवी मुंबई : ‘नशामुक्त नवी मुंबई’ मोहिमेअंतर्गत पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेले सुमारे २६ कोटी ३० लाख रुपये किमतीचे ७२६ किलोग्रॅम अंमली पदार्थ नष्ट केले. ही कारवाई बुधवारी दुपारी तळोजा…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

Mr Jones online casino – what to know

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

Mr Jones Casino payment methods – instant UK deposits & fast withdrawals

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

QBet login guide for UK players – registration steps, security & mobile access

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

QBet Casino guide: UK players’ full overview of bonuses, payments and mobile app

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

QBet online casino – what UK players need to know

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

كيفية التحقق من حسابك في 1xbet بعد تحميل 1xbet 2025 APK في الإمارات

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views
error: Content is protected !!