फिलिपिन्समध्ये ७.८ रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; ३५ जणांचा मृत्यू, शाळा कोसळून विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

मनिला : न्यूज एजन्सी

मिन्डोनाओ बेटाजवळील समुद्रात ३३ किलोमीटर खोलीवर ७.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाल्याने फिलिपिन्सच्या दक्षिणेकडील भागाला मोठा तडाखा बसला असून, या भीषण नैसर्गिक आपत्तीत किमान ३५ जणांचा मृत्यू झाला आहे तर २०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. भूकंपाच्या तीव्र धक्क्यांमुळे डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले असून सारंगानी प्रांतातील केवळ ग्लान या गावात दरड कोसळल्याने १३ जणांना आपला जीव गमावावा लागला आहे, तर दुसरीकडे सुमारे ७ लाख लोकसंख्या असलेल्या ‘जनरल सँतोस’ या प्रमुख बंदर शहरात अनेक इमारती कोसळल्या आहेत. उन्हाळी सुट्ट्यांनंतर नेमक्या आजपासूनच शाळा सुरू झाल्या असल्याने एका दुमजली शाळेची इमारत कोसळून ढिगाऱ्याखाली काही विद्यार्थी अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून सकाळी राष्ट्रगीत व ध्वजारोहण कार्यक्रमासाठी जमलेले १०० हून अधिक विद्यार्थी किरकोळ जखमी झाले तर काही जण भीतीपोटी बेशुद्ध पडले. सुरक्षेचा उपाय म्हणून जनरल सँतोस आंतरराष्ट्रीय विमानतळ तात्पुरते बंद करून १७ देशांतर्गत विमाने रद्द करण्यात आली आहेत, तसेच भूकंपाच्या धक्क्यांमुळे समुद्रकिनाऱ्यालगतच्या गावांमध्ये आलेल्या त्सुनामीच्या छोट्या लाटांनी मच्छिमारांच्या घरांचे मोठे नुकसान केले असून सुलतान कुदरात आणि सारंगानी प्रांतात १ ते १.४ मीटर उंचीच्या लाटांची नोंद झाली आहे. प्रशांत महासागराच्या ‘रिंग ऑफ फायर’ क्षेत्रात येत असलेल्या फिलिपिन्ससह इंडोनेशिया, पलाऊ आणि जपानच्या किनारपट्टीपर्यंत २० ते ८३ सेंटीमीटर उंचीच्या त्सुनामीच्या लाटा नोंदवल्या गेल्या असून, भूकंपाचे धक्के मलेशियापर्यंत जाणवले असले तरी सुमारे ५ तासांनंतर त्सुनामीचा धोका टळल्याचे घोषित करून इशारा मागे घेण्यात आला आहे.

Related Posts

New Hopa Casino account verification guide for UK players

New Hopa Casino – Practical Guide for UK Players Getting Started: Registration & Verification First impressions matter, and the new Hopa casino makes the sign‑up process straightforward. You will need…

Read more

PlayGrand UK steps and methods

PlayGrand Casino UK – Practical Guide for 2024 1. Getting Started: Registration & First Steps Creating an account at PlayGrand UK is a straightforward process that can be completed in…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

New Hopa Casino account verification guide for UK players

  • By admin
  • October 5, 2026
  • 1 views

PlayGrand UK steps and methods

  • By admin
  • October 5, 2026
  • 1 views

PlayGrand sign in steps and methods – Full UK guide

  • By admin
  • October 5, 2026
  • 1 views

PlayGrand Casino – What UK Players Need to Know

  • By admin
  • October 5, 2026
  • 1 views

PlayGrand Casino Review – Account Verification, Bonuses, Payments & Mobile Guide for UK Players

  • By admin
  • October 5, 2026
  • 1 views

Laadukas_atefia_ratkaisu_tarjoaa_kattavat_työkalut_ja_luotettavan_suojan_digita

  • By admin
  • October 4, 2026
  • 1 views
error: Content is protected !!