महाराष्ट्रावर अवकाळीचे सावट! विदर्भासह मराठवाड्याला ‘यलो अलर्ट’; बळीराजा पुन्हा चिंतेत

मुंबई (प्रतिनिधी):

राज्यात एका बाजूला उन्हाचा चटका वाढत असतानाच आता दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाचे संकट उभे ठाकले आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील ३ ते ४ दिवस राज्याच्या विविध भागांत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला असून अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता असून ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहतील. १४ आणि १५ मार्च रोजी विदर्भात पावसाचा प्रभाव सर्वाधिक राहण्याचा अंदाज आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांतही ढगाळ वातावरण राहणार असून तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळतील. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे आणि नगर जिल्ह्यातही दुपारनंतर हवामानात बदल होऊन पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे ही स्थिती निर्माण झाली असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सध्या अनेक भागांत रब्बी पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आहे तर आंबा आणि काजू पिकालाही या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. अचानक येणाऱ्या पावसामुळे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी काढणी केलेला माल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा आणि शेतीकामांचे नियोजन पावसाचा अंदाज घेऊनच करावे असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

Related Posts

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; पेपरफुटीच्या वादात एमपीएससी (MPSC) सचिव पदमुक्त

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांमधील पेपरफुटी आणि अनियमिततेच्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक कठोर पाऊल उचलले आहे. सरकारने तात्काळ प्रभावाने एमपीएससीचे सचिव महेंद्र उत्तमराव हरपाळकर यांची प्रतिनियुक्ती…

Read more

कोल्हापूरमध्ये सावकारीचा जाच: ६ लाखांच्या कर्जापोटी उकळले अडीच कोटी, २ वर्षांच्या चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न

कोल्हापूर: महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये खाजगी सावकारांची मुजोरी आणि अत्याचाराचे एक अत्यंत धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका महिला अभियंत्याने (इंजिनिअर) ६ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते, ज्याच्या बदल्यात तिने सावकाराला तब्बल…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

New Hopa Casino account verification guide for UK players

  • By admin
  • October 5, 2026
  • 1 views

PlayGrand UK steps and methods

  • By admin
  • October 5, 2026
  • 1 views

PlayGrand sign in steps and methods – Full UK guide

  • By admin
  • October 5, 2026
  • 1 views

PlayGrand Casino – What UK Players Need to Know

  • By admin
  • October 5, 2026
  • 1 views

PlayGrand Casino Review – Account Verification, Bonuses, Payments & Mobile Guide for UK Players

  • By admin
  • October 5, 2026
  • 1 views

Laadukas_atefia_ratkaisu_tarjoaa_kattavat_työkalut_ja_luotettavan_suojan_digita

  • By admin
  • October 4, 2026
  • 1 views
error: Content is protected !!