जयगड जेएसडब्ल्यू पोर्टवर सुरक्षा वाऱ्यावर; बिहारच्या कामगाराचा ४५ मीटर उंचीवरून पडून मृत्यू

रत्नागिरी : दिपक भागवत

जयगड येथील जेएसडब्ल्यू पोर्टवर ३७ वर्षीय परप्रांतीय कामगार राजकुमार बालेश्वर सिंग (रा. सेमरा, अनुग्रह नगर, सिवान, बिहार) याचा तब्बल ४५ मीटर उंचीवरून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवार, १३ जून रोजी संध्याकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास घडली असून यामुळे येथील औद्योगिक सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकुमार हा जेएसडब्ल्यू पोर्टवरील बी-५ येथील कोल शेडवर अंदाजे ४५ मीटर उंचीवर लोखंडी पर्लिंगचे काम करत होता; कामाची वेळ संपल्यानंतर तो इतर सहकाऱ्यांसोबत खाली उतरत असताना, पुढे सरकण्यासाठी सेफ्टी हुक बदलताना त्याचे हुक योग्य ठिकाणी अडकले नाही आणि त्याच क्षणी त्याचा पाय तिथल्या फायबरच्या पत्र्यावर पडला. कामगाराच्या वजनामुळे तो फायबरचा पत्रा अचानक तुटल्याने राजकुमार थेट ४५ मीटर उंचीवरून खाली जमिनीवर कोसळला आणि गंभीर दुखापत झाल्याने जागीच बेशुद्ध पडला. अपघात घडताच इतर कामगार आणि व्यवस्थापनाने त्याला तातडीने उपचारासाठी वाटद खांडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून संध्याकाळी ६:१५ वाजता त्याला मृत घोषित केले. या भीषण अपघातानंतर ४५ मीटरसारख्या अतिधोकादायक उंचीवर काम करताना डबल लॅन्यार्ड सेफ्टी हार्नेस वापरण्याचा नियम पाळला गेला नव्हता का, तसेच अपघात झाल्यास कामगाराचा जीव वाचवण्यासाठी खाली सेफ्टी नेट का बसवण्यात आली नव्हती, असे अनेक संतप्त प्रश्न उपस्थित केले जात असून व्यवस्थापनाच्या संभाव्य हलगर्जीपणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या प्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस. कायदा कलम १९४ प्रमाणे अकस्मात मृत्यू (क्रमांक २३/२०२६) अशी नोंद करण्यात आली असून, हा अपघात स्पष्टपणे हलगर्जीपणामुळे झाल्याचे दिसत असल्याने कामगाराच्या मृत्यूला जबाबदार कंपनी प्रशासनावर निष्काळजीपणाने मृत्यूला कारणीभूत ठरल्याबद्दल कलम १०६ नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.

Related Posts

संगमेश्वरजवळ मध्यरात्री कारचा भीषण अपघात; तीन जण जखमी, मोठा अनर्थ टळला

संगमेश्वर : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वरनजीक वांद्री-सप्तलिंगी पुलाजवळ गुरुवारी मध्यरात्री एका भरधाव कारचा भीषण अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगतच्या मोठ्या दगडावर आदळून उलटली. या थरारक अपघातात…

Read more

देवरुख: इन्स्टाग्रामवरील संशयास्पद APK फाईलमुळे तरुणाची ५५ हजारांची ऑनलाईन फसवणूक

देवरुख : प्रतिनिधी सोशल मीडियावरून अज्ञात लिंक किंवा फाईल्स डाऊनलोड करणे किती धोक्याचे ठरू शकते, याचा धक्कादायक प्रकार संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथे उघडकीस आला आहे. इन्स्टाग्रामवरून आलेली संशयास्पद एपीके (APK)…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

Mr Jones online casino – what to know

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

Mr Jones Casino payment methods – instant UK deposits & fast withdrawals

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

QBet login guide for UK players – registration steps, security & mobile access

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

QBet Casino guide: UK players’ full overview of bonuses, payments and mobile app

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

QBet online casino – what UK players need to know

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

كيفية التحقق من حسابك في 1xbet بعد تحميل 1xbet 2025 APK في الإمارات

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views
error: Content is protected !!