टोलमाफी नाही, तर टोलनाकाही नाही! अरविंद लांजेकरांचा प्रशासनाला थेट इशारा

राजापूर : प्रतिनिधी
राजापूर तालुक्यातील हातिवले येथे मुंबई-गोवा महामार्गावर उभारण्यात आलेला बहुचर्चित टोलनाका पुढील महिन्याच्या अखेरीस सुरू होण्याच्या हालचालींना प्रशासकीय पातळीवर वेग आला आहे. मात्र, हा टोलनाका कार्यान्वित होण्यापूर्वीच राजापूर तालुक्यातील स्थानिक वाहनचालक, व्यावसायिक आणि नागरिकांना संपूर्ण टोलमाफी देण्यात यावी, अशी जोरदार मागणी पुढे आली आहे. स्थानिकांना टोलमाफी न दिल्यास तीव्र जनआंदोलन छेडून हा टोलनाका सुरू होताच बंद पाडू, असा थेट इशारा कोंढेतडचे माजी उपसरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते अरविंद लांजेकर यांनी प्रशासनाला दिला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव येथील टोलनाका नुकताच सुरू झाल्याने आता हातिवले टोलनाकाही सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली वाढल्या आहेत. मात्र, या टोलनाक्यावर स्थानिकांना सरसकट टोलमाफी मिळावी, ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. याच मागणीसाठी सुमारे पाच वर्षांपूर्वी स्थानिकांनी महामार्गावर ठिय्या आंदोलन करूनही प्रशासनाने अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. हा जुना प्रश्न प्रलंबित असतानाच आता पुन्हा टोलवसुलीची तयारी सुरू झाल्याने स्थानिकांमध्ये असंतोष खदखदू लागला आहे.

राजापूर शहर व तालुक्यातील अनेक नागरिकांना दैनंदिन कामानिमित्त दिवसातून चार ते पाच वेळा या मार्गावरून ये-जा करावी लागते. अशावेळी प्रत्येक फेरीला टोल भरावा लागल्यास स्थानिक नागरिक आणि व्यावसायिक वाहतूकदारांवर मोठा व अन्यायकारक आर्थिक भुर्दंड पडणार आहे. याबाबत यापूर्वीही राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे अनेक निवेदने देऊनही प्रशासनाने त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे.

याच पार्श्वभूमीवर अरविंद लांजेकर यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाने स्थानिकांच्या या रास्त मागणीचा गांभीर्याने विचार करून टोलनाका सुरू होण्यापूर्वीच राजापूरकरांसाठी संपूर्ण टोलमाफीचा निर्णय जाहीर करावा, अशी मागणी केली आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास आगामी काळात हातिवले टोलनाक्यावरून प्रशासन विरुद्ध नागरिक असा मोठा संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.

Related Posts

फळबागायतदारांना हवामान आधारित विमा कवच !

आंबा, काजू, नारळ आणि सुपारी उत्पादकांना मोठा दिलासा रत्नागिरी : प्रतिनिधी बदलत्या हवामानामुळे फळपिकांच्या उत्पादनात होणारी घट आणि त्यामुळे शेतकऱ्यांना सोसावे लागणारे नुकसान लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्ह्यात सन २०२६-२७ या…

Read more

अनधिकृत गॅस कनेक्शन आणि रेशन कार्ड तक्रारींची तात्काळ चौकशी करा; जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश

रत्नागिरी : प्रतिनिधी अनधिकृत गॅस कनेक्शन आणि रेशन कार्ड वाटपासंदर्भात दाखल झालेल्या तक्रारींची अत्यंत सखोल चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करावा, असे स्पष्ट निर्देश रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

Geweldige_kansen_en_betrouwbare_informatie_over_https_zombillioncasinos-netherla

  • By admin
  • October 6, 2026
  • 0 views

Αξιολόγηση_κριτηρίων_παιχνιδιού_και_ασφάλε-72507116

  • By admin
  • October 6, 2026
  • 1 views

Effectieve_strategieën_en_https_the-westaces-nl_nl_voor_succesvolle_projectplan

  • By admin
  • October 6, 2026
  • 2 views

Excellent_options_for_players_seeking_kingdomcasino_rewards_and_exceptional_casi

  • By admin
  • October 6, 2026
  • 2 views

Mr Luck mobile app guide for UK players

  • By admin
  • October 6, 2026
  • 2 views

mrluck payment methods guide for UK players – deposits & withdrawals

  • By admin
  • October 6, 2026
  • 2 views
error: Content is protected !!