डोंबिवलीत भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; भाजप उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला

ठाणे : प्रतिनिधी 

 कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वी डोंबिवलीत राजकीय हिंसाचाराची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी रात्री उशिरा डोंबिवली पूर्व येथील तुकाराम नगर भागात भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) कार्यकर्ते आपापसात भिडल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. या संघर्षात भाजप उमेदवार आर्या नातेकर यांचे पती ओमनाथ नातेकर यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला असून ते गंभीर जखमी झाले आहेत.

या राड्याचे मुख्य कारण म्हणजे निवडणुकीतील ‘पैसे वाटपाचे’ आरोप असल्याचे सांगितले जात आहे. भाजप कार्यकर्ते मतदारांना ३ हजार रुपयांची पाकिटे वाटत असल्याचा संशय शिवसेना कार्यकर्त्यांना होता. यावरून दोन्ही गटात बाचाबाची सुरू झाली आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील आणि त्यांचे समर्थक यांनी ओमनाथ नातेकर यांना मारहाण केल्याचा आरोप भाजपने केला आहे. नातेकर यांना तातडीने एम्स (AIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

या घटनेनंतर डोंबिवलीत महायुतीमधील दरी पुन्हा एकदा स्पष्टपणे समोर आली आहे. प्रभाग क्रमांक २९ मध्ये भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी स्वतंत्र उमेदवार उभे केल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तिथे प्रचंड चुरस निर्माण झाली होती. या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी डोंबिवली पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी करत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली.

डोंबिवली पोलिसांनी याप्रकरणी तातडीने पावले उचलत शिवसेना उमेदवार नितीन पाटील, त्यांचे भाऊ रवी पाटील आणि इतर सात ते आठ कार्यकर्त्यांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाच्याच दोन गटांमध्ये अशा प्रकारे ‘राडा’ झाल्याने पोलीस प्रशासनाने शहरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे.

Related Posts

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण: राजकीय स्वार्थापोटी मला गोवण्याचा प्रयत्न; माजी महापौर मीनाक्षी शिंदेंचे सडेतोड प्रत्युत्तर

ठाणे : अशोक घाग प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येशी माझा किंवा माझ्या कुटुंबाचा काडीमात्र संबंध नाही. केवळ राजकीय फायद्यासाठी ‘टाळूवरचे लोणी खाण्याचा’ हा निंदनीय प्रकार सुरू असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत…

Read more

उद्धव ठाकरेंना पाहताच पूर्णेकर कुटुंबीयांचा आक्रोश; ‘आम्ही ठामपणे सोबत आहोत’, ठाकरेंनी दिला धीर

ठाणे : अशोक घाग ठाकरे गटाचे निष्ठावान पदाधिकारी प्रदीप पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्येनंतर ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्या सांत्वनपर भेटीनंतर आज शिवसेना (उद्धव…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

New Hopa Casino account verification guide for UK players

  • By admin
  • October 5, 2026
  • 1 views

PlayGrand UK steps and methods

  • By admin
  • October 5, 2026
  • 1 views

PlayGrand sign in steps and methods – Full UK guide

  • By admin
  • October 5, 2026
  • 1 views

PlayGrand Casino – What UK Players Need to Know

  • By admin
  • October 5, 2026
  • 1 views

PlayGrand Casino Review – Account Verification, Bonuses, Payments & Mobile Guide for UK Players

  • By admin
  • October 5, 2026
  • 1 views

Laadukas_atefia_ratkaisu_tarjoaa_kattavat_työkalut_ja_luotettavan_suojan_digita

  • By admin
  • October 4, 2026
  • 1 views
error: Content is protected !!